शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

मुंबई, ठाण्यात टांग्यांच्या जागी विद्युत घोडागाडी; इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणाच्या सवलती लागू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 00:37 IST

मुंबईसह राज्यातील सर्वच शहरांत पर्यावरणपूरक अशी विद्युत घोडागाडी सुरू करण्यास गृहविभागाने मंगळवारी मान्यता दिली आहे.

- नारायण जाधवठाणे : प्राणिमित्रांनी दाखल केलेल्या याचिकेमुळे मुंबई, ठाण्यासह राज्यात शासनाने बंदी घातलेल्या घोड्यांच्या टांग्याची जागा विद्युत घोडागाडी घेणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्वच शहरांत पर्यावरणपूरक अशी विद्युत घोडागाडी सुरू करण्यास गृहविभागाने मंगळवारी मान्यता दिली आहे. यामुळे मरिन ड्राइव्ह, गिरगाव, जुहू चौपाटीसह ठाण्याच्या तलावपाळीवर विद्युत घोडागाड्या धावताना दिसतील.ज्या भागात यापूर्वी टांगे सुरू होते, ते जितक्या प्रमाणात सुरू होते, त्याच प्रमाणात आणि त्याच मार्गांवर या विद्युत घोडागाड्या धावतील, असे गृहविभागाने स्पष्ट केले आहे. ‘यूबीओ रिड्झ’ या संस्थेच्या अहवालानंतर प्रायोगिक तत्त्वावर घोडागाड्यांना मान्यता दिली आहे. गृहविभागाने मान्यता दिलेल्या विद्युत घोडागाड्यांमध्ये चालकांव्यतिरिक्त सहा प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी आहे. या विद्युत घोडागाड्यांची आरटीओकडे नोंदणी करणे आवश्यक आहे. याच्या चालकांना मोटार वाहन कायद्यान्वये परवाना घेणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व्हीटीएस प्रणाली बसवणे आवश्यक असून मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विद्युत घोडागाडी परवाना आणि बॅज घेणे क्रमप्राप्त केले आहे. त्यांच्या चालण्याच्या वेळांचे आणि मार्गांचे परिचालन हे वाहतूक पोलिसांनी सुनिश्चित केल्यानुसारच करावे, असे बंधन या विद्युत घोडागाडीच्या चालकांना घालण्यात आले आहे. राज्याच्या उद्योग विभागाने २०१८ च्या इलेक्ट्रिक व्हेइकल धोरणातील १४ फेबु्रवारी २०१८ रोजी जाहीर केलेल्या सर्व सवलती लागू असणार आहेत.माहिती एमएमआरडीएलापहिल्या सहा महिन्यांपर्यंत प्रत्येक फेरीसाठीचे भाडे परवानाधारकास त्याने निश्चित केलेल्या दराप्रमाणे घेता येईल. तथापि, याची माहिती त्याने मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाला देणे आवश्यक आहे. यानंतर, वाहन चालनाच्या खर्चाचा अंदाज घेऊन आरटीओने प्रत्येक फेरीचे भाडे निश्चित करायाचे आहे.

टॅग्स :thaneठाणे