शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात निवडणूक यंत्रणेचा सावळागोंधळ, दुचाकीवरून ईव्हीएम नेल्याने राडा, उमेदवारांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 23:12 IST

 उल्हासनगर कॅम्प नं-४, हनुमाननगर येथील मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वाचे साहित्य कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान केला.

सदानंद नाईक उल्हासनगर : लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या मतदान प्रक्रियेत निवडणूक यंत्रणेच्या निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. कॅम्प नंबर ४ मधील हनुमाननगर येथील मतदान केंद्रावर, चक्क दुचाकीवरून कोणत्याही सुरक्षेशिवाय ईव्हीएम मशीन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून स्थानिक उमेदवारांनी निवडणूक प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, हनुमाननगर येथील मतदान केंद्रावरील निवडणूक कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन आणि इतर महत्त्वाचे साहित्य कोणत्याही पोलीस संरक्षणाशिवाय दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न रात्री साडे आठ वाजण्याच्या दरम्यान केला. हा प्रकार परिसरातील सतर्क नागरिकांच्या लक्षात आला. केंद्रापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर नागरिकांनी या कर्मचाऱ्यांना अडवले आणि जाब विचारला. नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत या कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीनसह पुन्हा मतदान केंद्रावर आणले. यावेळी निवडणूक यंत्रणेचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आल्याने केंद्राबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. निवडणूकीतील स्थानिक उमेदवार अ‍ॅड. जय गायकवाड आणि संदीप गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

ईव्हीएम सारख्या संवेदनशील वस्तूची ने-आण करण्यासाठी ठरवून दिलेल्या नियमावलीचे उल्लंघन झाल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोग पारदर्शकतेच्या गप्पा मारते, मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांकडून इतका हलगर्जीपणा होतोय. सुरक्षेशिवाय दुचाकीवर मशीन नेणे हे संशयास्पद असून संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. 

प्रशासनावर प्रश्नचिन्ह

 साधारणपणे मतदान संपल्यानंतर ईव्हीएम मशीन बंदोबस्तात नेण्यासाठी विशेष वाहनांची सोय असते. मात्र, उल्हासनगरमध्ये कर्मचाऱ्यांनी दुचाकीचा वापर का केला? त्यांना सुरक्षा का पुरवण्यात आली नव्हती? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकारामुळे मतदानाच्या गोपनीयतेवर आणि सुरक्षिततेवर नागरिकांनी शंका उपस्थित केली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, निवडणूक निर्णय अधिकारी यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ulhasnagar Election Chaos: EVM Transported on Bike, Candidates Angered

Web Summary : Ulhasnagar saw election irregularities as EVMs were transported unsecured on a motorbike. Angered candidates questioned the administration's negligence, demanding strict action for violating transport protocols and compromising election integrity. Police presence increased as investigation started.