शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदर महापालिकेत महापौर, उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारीला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 20:46 IST

भाजपा मध्ये चौघे इच्छूक तर मेहता गटाच्या रुपाली मोदी यांचे पारडे जड

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी २६ फेब्रुवारी रोजी निवडणुक होणार असुन २४ रोजी इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३ ते ५ अशी २ तासांची वेळ मिळणार आहे. महापौर पद अनुसुचीत जातीसाठी राखीव असल्याने भाजपातुन ज्योत्सना हसनाळे, दौलत गजरे, निला सोन्स व रुपाली मोदी असे चौघे इच्छुक असले तरी माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक मोदी यांचे नाव निश्चीत मानले जाते. उपमहापौर पदासाठी देखील मेहता समर्थक ध्रुवकिशोर पाटील यांचे नाव असले तरी विद्यमान उपमहापौर चंद्रकांत वैती, रवी व्यास, सुरेश खंडेलवाल आदी या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर मेहता गटाचे वर्चस्व मोडुन काढण्यासाठी आमदार गीता जैन व त्यांचे समर्थक तसेच शिवसेना व कॉंग्रेसच्या भुमिके कडे देखील लक्ष लागुन आहे.मीरा भार्इंदर महापालिकेत भाजपाचे ६१ , शिवसेनेचे २२ तर काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपा कडे स्पष्ट बहुमत असल्याने २०१७ सालचे महापौर पद इत्तर मागासवर्गिय प्रवर्गासाठी राखीव होते. त्यावेळी मेहतांनी त्यांची भावजय डिंपल मेहता यांची महापौर पदी वर्णी लावली होती. डिंपल यांना कामकाजाचा अनुभव नसल्याने उपमहापौर पदी चंद्रकांत वैती यांना संधी मिळाली होती. डिंपल यांची महापौर पदाची तर वैती यांची उपमहापौर पदाची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपणार आहे.महापालिकेच्या सचीव कार्यालयाने सर्व नगरसेवकांना महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्र म पाठवला असुन सोबत अर्ज दिले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ३ ते ५ या वेळेत इच्छुकांचे अर्ज सचीव कार्यालयात स्विकारले जातील. २६ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बावीकर यांच्या अध्यक्षते खाली महापौर पदाची निवडणुक होईल.यंदाचे महापौर पद अनुसुचीत जाती साठी राखीव असल्याने या प्रवर्गातुन भाजपात ज्योत्सना हसनाळे, रुपाली शिंदे - मोदी, दौलत गजरे हे तीघेजण इच्छुक होते. पण भाजपाच्या निला सोन्स यांनी देखील अनुसुचीत जातीचा दाखला हाती येताच महापौर पदासाठी दावा ठोकल्याने भाजपात इच्छुकांची संख्या चार झाली आहे. निला ह्या मेहतांच्या विरोधक तर रुपाली ह्या कट्टर समर्थक मानल्या जातात. निला यांनी त्यांच्या मुलास मेहतांच्या सेव्हन सक्वेअर शाळेतुन काढल्याच्या विरोधात थेट उच्च न्यायालया पर्यंत दाद मागीतली होती. ज्योत्सना ह्या अनुभवी असल्या तरी मर्जीतला महापौर हवा म्हणुन रुपाली यांचे नाव निश्चीत झाल्याची चर्चा आहे. कारण महापौर डिंपल जरी असल्या तरी त्यांच्या दालनातील अ‍ॅन्टीचेंबर मध्ये मेहतांचा तळ आहे. त्यामुळे मर्जीतला महापौर असेल तर तळ कायम राहील असे समीकरण असल्याचे सूत्रांनी सांगीतले.उपमहापौर पदासाठी चंद्रकांत वैती पुन्हा इच्छुक असले तरी त्यांचा पत्ता कापुन सद्याचे कट्टर मेहता समर्थक तसेच आमदार गीता जैन यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे ध्रुवकिशोर पाटील यांना उपमहापौर पदासाठी उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. उपमहापौर पदासाठी भाजपाचे रवी व्यास, सुरेश खंडेलवाल, मदन सिंग आदी देखील इच्छुक मानले जात असले तरी मेहतां कडुन त्यांची डाळ शिजु दिली जाईल या बाबत साशंकताच आहे.भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस व रविंद्र चव्हाण यांच्याशी मेहतांचे असलेले सलोख्याचे संबंध , मेहतांचे निकटवर्तिय मानले जाणारे भाजपाचे गटनेते हसमुख गेहलोत आदी कारणांनी मेहता सुचवतील तेच उमेदवार महापौर व उपमहापौर पदासाठी दिले जातील असे जवळपास निश्चीत मानले जाते. त्यामुळे स्थायी समिती, स्विकृत नगरसेवक तसेच अन्य समित्यां मध्ये सदस्य नियुक्तीत डावलण्यात आलेल्या आमदार गीता जैन यांना महत्वाच्या महापौर व उपमहापौर उमेदवारीत देखील डावलले जाणार असे स्पष्ट संकेत मेहतांच्या गोटातील सूत्रांनी दिले आहेत. त्यामुळे आ. गीता यांच्यासह शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या भुमिके कडे देखील लक्ष लागले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMayorमहापौरBJPभाजपा