शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदाची निवडणूक : नाराज नगरसेवकांवर वॉच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2018 02:42 IST

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून दगाफटका होऊ नये म्हणून साई, भाजपातील नाराज व बंडखोर नगरसेवकांवर भाजपाकडून वॉच ठेवण्यात येत आहे. भाजपाचाच महापौर होणार असल्याची प्रतिक्रीया प्रकाश माखिजा यांनी दिली आहे.भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ओमी कलानी टीमच्या दबावापुढे लोटांगण घेत मीना आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. महापौरपदाची ...

- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौरपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून दगाफटका होऊ नये म्हणून साई, भाजपातील नाराज व बंडखोर नगरसेवकांवर भाजपाकडून वॉच ठेवण्यात येत आहे. भाजपाचाच महापौर होणार असल्याची प्रतिक्रीया प्रकाश माखिजा यांनी दिली आहे.भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ओमी कलानी टीमच्या दबावापुढे लोटांगण घेत मीना आयलानी यांना महापौरपदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले. महापौरपदाची निवडणूक सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवडयात जाहीर होणार आहे. निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून साई व भाजपातील नाराज व बंडखोर नगरसेवकांच्या प्रत्येक हालचालींवर पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. तशी कबुली भाजपाच्याा स्थानिक नेत्याने नाव प्रसिध्द न करण्याच्या अटीवर दिली. महापौरपदाची निवडणूक जाहीर होताच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना गुप्त ठिकाणी नेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.लोकसभा व विधानसभा निवडणुका पुढीलवर्षी होत असल्याने शिवसेनेलाही महापौरपद हवे आहे. त्यादृष्टीकोनातून शिवसेनेने गुप्त हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेनेचे एकूण २५ नगरसेवक असून राष्ट्रवादीचे -चार, रिपाइं- दोन, काँॅगे्रस, भारिप व पीआरपी पक्षाचे प्रत्येकी एक असे एकूण ९ नगरसेवक सोबत असल्याचा शिवसेनेने दावा केला आहे.तसेच साई व भाजपातील नाराज नगरसेवकांवर शिवसेनेनेही लक्ष केंद्रीत केले. मात्र शिवसेनेचे महापौरपदाचे स्वप्न भंग करण्यासाठी भाजपानेही कंबर कसली आहे. शिवसेने सोबतच्या भारिप, रिपाइं व पीआरपीच्या नगरसेवकांना भाजपाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.>प्रकाश माखिजांकडे दिली सूत्रेभाजपातील निष्ठांवत गटाचे नेतृत्व करणारे प्रकाश माखिजा यांच्याकडे महापौरपदाच्या निवडणुकीची जबाबदारी वरिष्ठांनी सोपविली आहे. त्यांचे सर्वच पक्षांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याने इतर लहान पक्षाच्या नगरसेवकांना आपल्या बाजूने वळविण्यात यशस्वी होतील असे बोलले जात आहे. महापौरपद ओमी टीमकडे गेले असली तरी पंचम कलानी भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत. त्या अधिकृतपणे भाजपाच्या असल्याचे माखिजा यांनी सांगितले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर