शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात एसटी बसच्या धडकेत पादचारी वृद्ध महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 23:49 IST

खोपट येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शिरणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय पार्वती गोपीनाथ खरात ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी चालक बबन दिलीप भामरे यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे दोन्ही पाय जायबंदीचालकाविरुद्ध गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: खोपट येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये शिरणाºया एसटी महामंडळाच्या बसने दिलेल्या धडकेत ८० वर्षीय पार्वती गोपीनाथ खरात ही वृद्ध महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. यात तिच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली असून चालक बबन दिलीप भामरे यांच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाण्यातील वर्तकनगर, भीमनगर येथे राहणारी ही कचरावेचक वृद्ध महिला खोपट बस स्थानकासमोरुन गुरुवारी दुपारी २ ते २.३० वाजण्याच्या सुमारास जात होती. त्याचवेळी शहापूर ते ठाणे या मार्गावरील एसटी बसने तिला धडक दिली. दोन्ही पायांवरून बसचे चाक गेल्याने दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही पायांना गंभीर दुखापत होऊनही तशाच अवस्थेत ही महिला त्याठिकाणी बराच वेळ विव्हळत बसली होती. नंतर राबोडी पोलिसांच्या मदतीने तिला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.* लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा अजूनही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी मर्यादीत सुरु आहे. त्यामुळे खोपट रेल्वे स्थानकातून कल्याण, शहापूर तसेच मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. जवळच सीएनजी भरण्यासाठी रिक्षांचीही मोठी रांग असते. त्यामुळेच याठिकाणी नेहमी अपघात होत असतात. एक आठवडयापूर्वीही अशाच अपघातात एकाला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे या भागात वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीAccidentअपघात