शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये इमारतीच्या गॅलरीसहीत वृद्ध महिला खाली कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 15:47 IST

भाईंदरमधील सुमारे 38 वर्ष जुनी असलेली मेंडीस हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेची गॅलरी कपडे वाळत घालणाऱ्या वृद्ध महिलेसह कोसळल्याची घटना शुक्रवारी (15 जून ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

मीरारोड - भाईंदरमधील सुमारे 38 वर्ष जुनी असलेली मेंडीस हाऊस या इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सदनिकेची गॅलरी कपडे वाळत घालणाऱ्या वृद्ध महिलेसह कोसळल्याची घटना शुक्रवारी (15 जून ) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. जखमी महिलेला रुग्णालयात दाखल केले गेले आहे. ही इमारत पालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. पावसाळा सुरू झाल्यानंतरची ही पहिली दुर्घटना आहे .भाईंदर पश्चिमेस क्रॉस गार्डनच्या लेपोरा स्ट्रीटवर मेंडीस हाऊस ही तीन मजली इमारत आहे. प्रत्येक मजल्यावर दोन या प्रमाणे एकूण ६ सदनिका व तळाला तीन दुकाने आहेत. दुसऱ्या मजल्यावरील २०१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणाऱ्या मेरी जोजफ ( ७० ) या सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गॅलरीत कपडे वाळत घालत होत्या. त्याचवेळी अचानक बाल्कनीचा कठडा खाली कोसळला. परिसरातील रहिवाशांनी मेरी यांना त्वरित पालिकेच्या जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या तसेच अन्य मजल्या वरील रहिवाशांना बाहेर काढले. रस्त्यावर कोसळलेला मलबा बाजूला केला. परंतु पालिकेचे आपत्कालीन पथक मात्र चक्क अर्ध्या तासाने आले. पथकातील कर्मचाऱ्यांकडे अवजार - साहित्यदेखील नव्हते असे उपस्थित लोकं म्हणाली. इमारत रिकामी करण्यात आली असून तांत्रिक तपासणी करून घेण्यास पालिकेने रहिवाशांना सांगितले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईpalgharपालघर