शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एकनाथ शिंदे यांचा विजयाचा चौकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:59 IST

८९ हजार ३०० मताधिक्य; पहिल्या फेरीपासूनच घेतली मोठी आघाडी, कार्यकर्त्यांनी केला सत्कार

ठाणे : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ८९ हजार ३०० मताधिक्याने आपला गड कायम ठेवला. त्यांनी काँग्रेसचे संजय घाडीगावकर यांचा पराभव करून विजयाचा चौकार साधला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत, मतदारांनी दाखविलेले प्रेम आणि आशीर्वाद यामुळे हा विजय मिळवू शकल्याची प्रतिक्रिया विजयानंतर त्यांनी व्यक्त केली.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच त्यांनी निर्णायक आघाडी घेतली. पहिल्या फेरीत त्यांना चार हजार २३० मते मिळाली. त्यावेळी घाडीगावकर यांना ८९८, तर मनसेच्या महेश यांना ५५५ मते मिळाली. वंचित आघाडीचे उन्मेष बागवे हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यांना अवघी २३१ मते मिळाली. पुढे २७ व्या फेरीपर्यंत शिंदे यांनी आघाडी कायम राखली. एक लाख १३ हजार ४९७ मते मिळवून ते विजयी झाले. पराभूत घाडीगावकर यांना २४ हजार १९७ मते मिळाली. तर, मनसेच्या कदम यांना २१ हजार ५१३ मते मिळाली.

२०१४ मध्ये शिवसेना व भाजप युती नसतानाही शिंदे यांना एक लाख १४८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपच्या संदीप लेले यांचा त्यांनी पराभव केला होता. गेल्या विधानसभेच्या शिवसेना, भाजपच्या एक लाख ४८ हजार ५९५ मतांसह एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वास शिंदे यांना होता. अपेक्षित मताधिक्य साधता न आल्याने अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती.

दरम्यान, २००९ मध्येही ३२ हजार ७७६ चे मताधिक्य शिंदे यांना होते. २०१४ च्या तुलनेत यावेळी १३ हजार ३४९ चे मताधिक्य त्यांना मिळाले आहे. यावेळी ८९ हजार ३०० चे मताधिक्य साधून चौथ्यांदा यशस्वी ठरल्याने चौदाव्या फेरीलाच कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचा सत्कार करून जल्लोष केला.

महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत, मतदारसंघात केलेली विकासकामे, मतदारांचे प्रेम, विश्वास आणि आशीर्वादाच्या जोरावर ही निवडणूक जिंकलो. सर्व मतदार, कार्यकर्ते तसेच आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी देणाऱ्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आभारी आहे.-एकनाथ शिंदे, नवनिर्वाचित आमदार, कोपरी-पाचपाखाडी

जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. तसेच काँग्रेसच्या माध्यमातून ठाणे शहराला व ठाणेकरांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील.

- संजय घाडीगावकर, पराभूत उमेदवार, काँग्रेस

‘नोटा’चे प्रमाण २.९६ टक्के : या मतदारसंघात ४४३ पैकी ३४४ मतदारांनी शिंदे यांना टपाली मतदानातून कौल दिला. काँग्रेसच्या घाडीगावकर यांना २२ मते मिळाली. तब्बल पाच हजार १४७ मतदारांनी ‘नोटा’चा वापर करून सर्वच उमेदवारांना नाकारले. हे प्रमाण एकूण मतदानाच्या २.९६ इतके टक्के आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019kopri-pachpakhadi-acकोपरी-पाचपाखाडी