शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे वापरतात आयआरबीच्या उपकंपनीची गाडी; मनसे जिल्हाध्यक्षांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 19:36 IST

टोलबंदी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले शिवसेना- भाजपाचे सरकार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत.

अंबरनाथ : टोलबंदी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेवर आलेले शिवसेना- भाजपाचे सरकार नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे आयआरबी या टोल वसूल करणा-या कंपनीच्याच उपकंपनीची गाडी वापरत आहेत, असा आरोप मनसेचे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. राज्याचे मंत्रीच असा प्रकार करीत असतील तर त्यांच्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करणे व्यर्थ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अंबरनाथमध्ये एसबी या कंपनीत मराठी कामगारांना कामावरून काढल्याने या कामगारांना परत कामावर घेण्याची मागणी मनसेकडून करण्यात येत होती. या कंपनीत मराठी कामगारांवर अन्याय होत असल्याने या कंपनी विरोधात मनसेने मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चानंतर अविनाश जाधव यांनी सरकारवर आरोप करून पालकमंत्र्यांनाच अडचणीत आणले आहे. पालकमंत्री शिंदे हे ठाण्यात फिरताना जी गाडी वापरतात ती गाडी टोल वसूल करणारी आयआरबी कंपनीचीच उपकंपनी असलेल्या मॉडर्न रोड मेकर्स या कंपनीची आहे. राज्यभर जी आयआरबी कंपनी टोल वसूल करते त्याच कंपनीची उपकंपनी असलेल्यांची गाडी वापरत असले तर त्यात भ्रष्टाचारच म्हणावे लागेल, असा आरोप जाधव यांनी केला. राज्यात टोलनाके बंद करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.मात्र टोलवसुली तर सुरूच असून त्या टोलच्या मोबदल्यात आपला स्वार्थ साधण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. शिंदे वापरत असलेली एमएच 04 एस जे 3366 या गाडीची नोंदणी ही खासगी कंपनीच्या नावावर आहे. खासगी कंपनीच्या नावावर असलेली गाडी पालकमंत्री वापरत असतील तर त्याची त्यांना कल्पना असेलच असेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे. या संदर्भात पालकमत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे की ती गाडी आपल्याला शासनामार्फत आलेली आहे. शासनाच्या एमएसआरडीसीएकडून आलेली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.