शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात वंचित आणि अपक्षांच्या बळावर शिंदेसेनेने गाठली मॅजिक फिगर? किंगमेकर कोण ठरणार?

By सदानंद नाईक | Updated: January 20, 2026 07:25 IST

सत्तास्थापनेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. ही मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आलेली नाही.

सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापौर पदासाठीची उल्हासनगरमध्ये चुरस वाढली असून, वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेविकेने पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेने बहुमताचा ४० चा आकडा गाठल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही हार मानलेली नसून, पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आला आहे. ७८ जागांसाठीच्या निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. ही मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आलेली नाही.

भाजपचे ३७, तर शिंदेसेना आणि ओमी टीमचे ३६  नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपला बहुमतासाठी ३, तर शिंदेसेना आणि ओमी टीमला ४ जागा कमी आहेत. साई पक्ष (१), शिंदेसेना समर्थक अपक्ष (१), वंचित बहुजन आघाडी (२), अपक्ष (१) अशा पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमक्ष शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.

वंचित आणि अपक्ष ‘किंगमेकर’

शिंदेसेनेने राजकीय कौशल्याने अपक्ष आणि वंचितच्या नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्यात यश मिळवले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.

अपक्ष, साई पक्ष निर्णायक

अपक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी ओमी कलानी आणि शिवाजी रगडे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेला पाठिंबा दिला. तसेच साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनीही शिंदेसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिंदेसेनेची संख्या ४० वर पोहोचली.

आमचाच महापौर : भाजप

महापालिकेत सर्वाधिक ३७ जागा जिंकून मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे आला आहे. महापौर पदावर पहिला अधिकार आमचा आहे. बहुमतासाठी ४० ची मॅजिक फिगर गाठून आमचा महापौर होणार असल्याचा दावा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी सांगितले. 

भाजपची ‘वेट अँड वॉच’ भूमिका

शिंदेसेनेने बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला तरी, भाजप अजूनही शर्यतीत आहे. केवळ ३ नगरसेवक कमी असल्याने भाजपकडून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांशी संपर्काचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपने शेवटच्या क्षणी काही नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात यश मिळवले तर गणिते बदलू शकतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Uhasnagar: Shinde's Sena Reaches Magic Figure with Support from Minor Parties?

Web Summary : In Ulhasnagar, Shinde's Sena secured a majority for mayorship with support from Vanchit Bahujan Aghadi and independents. BJP still contests, aiming to sway members for victory. The political scenario remains dynamic.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Ulhasnagar Municipal Corporation Electionउल्हासनगर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा