शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’, न्यायालयाचा ठाकरे गटाला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2022 05:49 IST

बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचा निर्णय योग्य ठरवत ठाकरे गटाला धक्का दिला.

ठाण्याच्या तलावपाळी येथे दिवाळी पहाट साजरी करण्यास ठाकरे गटाला परवानी न देता, शिंदे गटाला परवानगी देण्याच्या ठाणे महापालिकेच्या निर्णयाला ठाकरे गटाचे मंदार विचारे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. मात्र, बुधवारी उच्च न्यायालयाने ठाणे महापालिकेचा निर्णय योग्य ठरवत ठाकरे गटाला धक्का दिला. त्यामुळे ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’ होणार आहे.

ठाणे महापालिकेने १० ऑक्टोबर रोजी ठाकरे गटाला प्राथमिक परवानगी दिल्यानंतर, १३ ऑक्टोबर रोजी शिंदे गटाला तलावपाळी येथे ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमासाठी स्टेज, मंडप उभारण्याची परवानगी दिली. पालिकेच्या या निर्णयाला ठाकरे गटाने उच्च न्यायालयात आव्हान दिले. न्या.रमेश धानुका व न्या. कमल खाता यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर सुनावणी होती. 

ठाकरे गटाच्या याचिकेत काय?पालिकेचा १३ ऑक्टोबरचा निर्णय कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर करून, तसेच नैसर्गिक न्यायतत्त्वाचे उल्लंघन करून घेण्यात आला आहे. पालिकेने त्यांच्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. संबंधित जागेवर २०१६-१७ पासून आम्ही  ‘दिवाळी पहाट’ साजरी करत आहोत. राजकीय वैमनस्यामुळे याचिकाकर्त्यांची छळवणूक करण्याच्या हेतूने प्रतिवादी असे वागत आहेत. प्रतिवादी (शिंदे गट) हे युवासेनेचे अध्यक्ष किंवा सदस्य नाही. त्यामुळे त्यांना अर्ज करण्याचा अधिकार नाही, याची पूर्ण कल्पना महापालिकेला होती.

ठाणे महापालिकेचा युक्तिवाद  

  • ठाणे महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्र महापालिका कायद्यानुसार कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी ३० दिवस आधी अर्ज करावा लागतो, तसेच वाहतूक विभाग, पोलीस व अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.  
  • ठाकरे गटाने १९ सप्टेंबर रोजी अर्ज केला, तर  शिंदे गटाने ३ ऑक्टोबर रोजी अर्ज केला. मात्र, शिंदे गटाने अर्जाबरोबर वाहतूक, पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून ‘ना-हरकत दाखला’ही घेतला आणि पालिकेपुढे सादर केला. 
  • त्यामुळे त्यांना परवानगी दिल्याचे  आपटे यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने ठाणे महापालिकेचा निर्णय योग्य असल्याचे म्हणत शिंदे गटाला मोठा दिलासा दिला.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेDiwaliदिवाळी 2022