शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
3
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
5
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
6
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
7
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
8
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
9
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
10
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
11
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
12
False Gangrape Case: बलात्काराचा खोटा गुन्हा; महिलेस साडेसात वर्षे शिक्षा, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
13
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
14
"म्हणजे पक्ष फोडून आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच...", हिंदी सक्तीवरुन मराठी लेखकाचा टोला
15
...तर तुमचे अकाउंट होऊ शकते हॅक; कोट्यवधी लोकांची खाजगी माहिती लीक झाल्याची भिती
16
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
17
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
18
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
19
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
20
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील

Eknath Shinde: बाबा शिवसेना सोडणार नाहीत! श्रीकांत शिंदे यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 10:00 IST

Eknath Shinde: राज्यात शिवसेना-भाजप युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती फाटक यांनी दिली, तसेच शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नाही किंवा ते सोडणारही नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

- अजित मांडकेठाणे  : एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी बुधवारी भेट घेऊन तासभर चर्चा केली. राज्यात शिवसेना-भाजप युती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केल्याची माहिती फाटक यांनी दिली, तसेच शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडलेली नाही किंवा ते सोडणारही नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिंदे यांचे बंड थोपविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या जवळचे समजले जाणारे फाटक आणि मिलिंद नार्वेकर यांना मंगळवारी सुरतला पाठविले होते. त्यांनी शिंदे यांची भेट घेतली. २५ मिनिटे चर्चा झाल्यानंतर ते दोघे परत आले. त्यानंतर, बुधवारी फाटक यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन खा.श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी बंड शमविण्याबाबत चर्चा केल्याची माहिती फाटक यांनी दिली, तसेच त्यांची  मनधरणी केली. श्रीकांत यांनी एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेबाबत काही बोलण्यास नकार दिला असला, तरी  शिवसेना-भाजपची युती व्हावी, अशी आशा व्यक्त केल्याचे फाटक यांनी सांगितले. काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर महाविकास आघाडी करणे अयोग्य होते. असेही त्यांनी सांगितले असल्याचे स्पष्ट केले.  दरम्यान शिंदे हे शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते शिवसेनेतच राहतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्यातही शिंदे यांनी काही चुकीच्या मागण्या केलेल्या नसून त्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात आणि त्यांच्यासकट सर्व आमदार शिवसेनेत राहोत हीच इच्छा असल्याचे फाटक यांनी सांगितले. 

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदेEknath Shindeएकनाथ शिंदे