शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

ठाण्यात रंगणार एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन, उल्हास राणे भूषवणार संमेलनाचे अध्यक्षपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:40 IST

‘परिसरातील पक्षी - त्यांचा जीवनक्रम आणि सवयी’ या सूत्रावर आधारित ठाण्यात एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन रंगणार आहे. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मँग्रुव्ह सेल, मुंबई यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.

ठाणे : ‘परिसरातील पक्षी - त्यांचा जीवनक्रम आणि सवयी’ या सूत्रावर आधारित ठाण्यात एकविसावे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन रंगणार आहे. या संमेलनात ठाणे महापालिका आणि मँग्रुव्ह सेल, मुंबई यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ निसर्ग अभ्यासक आणि पक्षिमित्र उल्हास राणे भूषवणार आहेत.होप नेचर ट्रस्ट आणि महाराष्ट्र पक्षिमित्र संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २५ नोव्हेंबर आणि रविवार, २६ नोव्हेंबर या दिवशी गडकरी रंगायतन येथे हे संमेलन आयोजित केले आहे. दोन दिवस चालणा-या या संमेलनात अभ्यासक, संशोधक यांच्याबरोबर हौशी पक्षिमित्र विविध विषयांवरील सादरीकरणे करणार आहेत. ठाण्यातील पक्षी हे ठाणे शहर व परिसरात आढळणाºया निवडक १०० पक्ष्यांचा परिचय करून देणारे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे. या संमेलनाच्या निमित्ताने पक्षी छायाचित्रांची स्पर्धा आणि प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. मुंबईशी स्पर्धा करून आपले नागरी क्षेत्र वाढवणाºया ठाण्याला निसर्गाचा वारसा लाभलेला आहे. एका बाजूला खाडीकिनारा आणि दुसºया बाजूला संजय गांधी नॅशनल पार्क यामध्ये वसलेल्या ठाण्याला समृद्ध जैवविविधतेचा ठेवा लाभलेला आहे. येऊर आणि नागलामधील संमिश्र जंगल, खाडीकिनाºयावरील खारफुटी वन आणि ठाणे पूर्व भागातील खुरट्या झाडांचा प्रदेश यामुळे ठाण्यात पक्ष्यांचे कमालीचे वैविध्य पाहायला मिळते. ठाणे खाडीतील ५० चौरस किलोमीटरचा परिसर फ्लेमिंगो सँक्च्युरी म्हणून घोषित केला असून त्यात ऐरोली येथील कोस्टल आणि मरिन बायोडायव्हर्सिटी सेंटरचाही समावेश आहे.या अभयारण्याच्या परिसरात सुमारे ३० हजार ग्रेटर आणि लेसर प्रकारचे फ्लेमिंगो हिवाळ्यामध्ये स्थलांतर करून येतात. त्याचबरोबरच या अभयारण्यामध्ये सुमारे २०० प्रकारचे अन्य पक्षी आणि इतर अनेक प्रकारचे सागरी जीव आढळतात. त्यामुळेच ठाण्यासारख्या शहरी क्षेत्रात महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन होत आहे, असे आयोजकांनी सांगितले.>राणे हे यापूर्वी बीएनएचएस या संस्थेच्या एज्युकेशन कमिटीचे अध्यक्षपद आणि बीएनएचएसच्या सेक्रेटरीपदाची धुरा त्यांनी सांभाळली आहे. पश्चिम घाट बचाओ मोहिमेत त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या अध्यक्षपदाखाली भरणाºया या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध भागांतले सुमारे ७०० ते ८०० पक्षिमित्र, अभ्यासक सहभागी होणार आहेत.