शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
2
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
3
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
4
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
5
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
6
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
7
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
8
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
9
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
10
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
11
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
12
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
13
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
14
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
15
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
16
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
17
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
18
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
19
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
20
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले

येऊरच्या निसर्ग परिचय केंद्रात चिऊताईची आठ फुटी प्रतिकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 8:16 PM

सिमेंट कॉक्रि ंटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. याची जाणीव करून देण्यासाठी आणि चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा संकल्प करून सुमारे एक हजार घरटे येथील संकल्प इंगिलश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लावले.

ठळक मुद्देफुलपाखरू उद्यानात आज आठ फुटाच्या चिऊ ताईची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी उभारून चिऊताई वाचवण्याचा संदेशजागतिक चिमणी दिन २० मार्च रोजी आहे. याची मोठ्याप्रमाणात जनजागृती चिऊ ताईच्या अस्थित्वाच्या गरजेची जाणीव

ठाणे : जागतिक चिमणी दिन २० मार्च रोजी आहे. याची मोठ्याप्रमाणात जनजागृती करून चिऊताईच्या अस्थित्वाची गरज, तिचा संभाळ करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना आदीं उपक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांनी या येऊरच्या निसर्ग परिचय केंद म्हणजे फुलपाखरू उद्यानात आज आठ फुटाच्या चिऊ ताईची प्रतिकृती विद्यार्थ्यांनी उभारून चिऊताई वाचवण्याचा संदेश दिला.सिमेंट कॉक्रिटच्या जंगलात चिमण्यांना राहायला जागा नाही. त्यांना घरटी बांधता येत नाही, त्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. उन्हाळ्यातही चिमण्यांना खूप त्रास होतो. याची जाणीव करून देण्यासाठी आणि चिमण्यांची संख्या वाढवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा संकल्प करून सुमारे एक हजार घरटे येथील संकल्प इंगिलश स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी लावले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, महाराष्टÑ वनविभाग आणि संकल्पइंग्लिश स्कूलच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम व उपक्रम मानपाडा येथे पार पडला.विद्यार्थ्यांनी आठ फुटाच्या चिमणीची प्रतिकृती तयार करून या उद्यानाच्या प्रवेशव्दाराव लावून चिऊ ताईच्या अस्थित्वाच्या गरजेची जाणीव करून दिली आहे. सध्या पर्यावरणाचा ºहास होत आहे. याबरोबर एक वेळ अशी येईल की चिमणीची ही प्रजाती नष्ट होईल. यास वेळीच पायबंद घालण्यासाठी मागील दोन वर्षांपासून चिमणी बचाव मोहिमेची सुरूवात येथील संकल्प इंगिलश स्कूलच्या उद्यार्थ्यांकडून करण्यात आली. यंदाही या विद्यार्थ्यांसह शाळेच्या शिक्षकांनी तुटलेल्या बेंचेस व अन्य मोडकळीस साहित्याव्दारे चिमणीची मोठी प्रतिकृती तयार करून लावली आहे. चिमणी वाचवा निसर्ग वाचवा, चिमणीवर प्रेम करा, चिमणी वाचवा निसर्गाचा बचाव करा आदी संदेशही विद्यार्थ्यांनी पोस्टरव्दारे यावेळी दिले.विद्यार्थी भावी पिढीचे प्रतिनिधीत्व करणार आहे. त्यांना निसर्ग जोपासण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाची आवड या विद्यार्थीवयात जोपासली तर पर्यावरणप्रेमी पिढी तयार करण्यासह प्रत्येक नागरिकांनी उन्हाळ्यात दाणापाणी व आडोशाला घरटी उभारून चिमणी वाचवण्याच्या चळवळीस बळ देण्याचा सूर या वेळी पार पडलेल्या कार्यक्रमात ऐकायला मिळाला. यावेळी मानपाडा परिसरात विद्यार्थ्यांनी रॅली काढून चिमणी बचाव संदेश दिला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागीय वनअधिकारी आर.बी. कुंभार, येऊरचे आरएफओ राजेंद्र पवार यांनी विद्यार्थ्यांना पारितोषक देऊन प्रोत्साहित केले , संकल्प इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योती परब, डॉ. राज परब आदींसह अक्षरमंच प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, पोएटरी मॅरेथॉनचे हेमंत नेहते आदींसह विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणेcity chowkसिटी चौक