शहरं
Join us  
Trending Stories
1
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
2
तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
3
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
4
बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईमध्ये सामूहिक बलात्कार, बदामबाईने आधी कला केंद्रावर नेलं, नंतर लॉजवर...
5
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
6
निवृत्तीनंतर हातात येणार रग्गड पैसा! NPS चे नवीन नियम लागू; ५ वर्षांचा 'लॉक-इन' कालावधी संपला
7
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद जाणार? आज अजित पवार यांची भेट घेणार, मोठ्या निर्णयाची शक्यता
8
शिंदेसेना ही अमित शाहांची 'टेस्ट ट्यूब बेबी', त्यांचा नैसर्गिक जन्म नाही; राऊतांची बोचरी टीका
9
Video - बापमाणूस! ६० फूट खोल बोरवेलमध्ये पडलेल्या लेकीसाठी वडिलांनी लावली जिवाची बाजी
10
विमा क्षेत्रात आता १००% परकीय गुंतवणुकीला मंजुरी; सर्वसामान्यांना स्वस्त पॉलिसी आणि चांगले पर्याय मिळणार?
11
'इस्लामिक दहशतवादाविरोधात उभे राहण्याची गरज', व्हाइट हाऊसमधून ट्रम्प यांचं आवाहन; केली मोठी घोषणा
12
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
13
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
14
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
15
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
16
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
17
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
18
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
19
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
20
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
Daily Top 2Weekly Top 5

कळव्यातील नागरिकांसाठी आठ तात्पुरत्या चिकित्सालयांची सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 21:01 IST

कोरोनाच्या भीतीमुळे कळवा परिसरातील काही दवाखानेही बंद झाले आहेत. नागरिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून काही सेवाभावी डॉक्टरांच्या मदतीने राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कळवा शहरात आठ ठिकाणी तात्पूरत्या स्वरुपामध्ये ‘कम्युनिटी डिस्पेन्सरी’ ही संकल्पना राबविली आहे.

ठळक मुद्देगृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा पुढाकारसेवाभावी डॉक्टरांची घेतली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: कोरोनाच्या संकटामुळे कळवा आणि मुंब्रा भागातील काही दवाखाने बंद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कळव्यातील नागरिकांच्या सोयीसाठी आठ तात्पूरते चिकित्सालय सुरु करीत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री तसेच कळवा मुंब्रा येथील स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.कोरोनाच्या संकटामुळे अनेक दवाखाने बंद झालेले आहेत. तसेच जे चालू आहेत, तेही अगदी अल्प वेळ चालविले जातात. त्यामुळे इतर रुग्णांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. ही गैरसोय होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी काही डॉक्टरांच्या मदतीने तात्पूरत्या चिकित्सालयांचा निर्णय घेतल्याचेही ते म्हणाले. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत ही केंद्र सुरु राहणार आहेत.मुंब्य्रातील डॉक्टरांनी एकत्र येऊन एका रु ग्णालयाचे रूपांतर तपासणी केंद्रामध्ये केले आहे. शहरातील ताप सर्दी खोकला किंवा कोरोना संबंधित लक्षण आढळल्यास या रुग्णालयात अशा रुग्णांची वेगळी तपासणी केली जाणार आहे. हे केंद्र शिवाजी नगर मुंब्रा येथे सुरु केले आहे. त्याप्रमाणेच कळवा भागातील आठ ठिकाणी अशी केंद्र सुरु करणार असल्याचे ते म्हणाले.अशी आहेत चिकित्सालये:१ कावेरी सेतू सेंटर: डॉ. सचिन म्हात्रे, डॉ. उत्तम थोरात, डॉ. प्रिती दवे आणि सुनंद खरात२. न्यू कळवा स्कूल सेंटर: डॉ. राजू पमनानी, डॉ. शैलेश चांदणे, डॉ. रुपेश दळवी आणि डॉ. सुनयना करे आदींचे पथक आहे.३. पारसिक नगर: डॉ. संजय पाटील, डॉ. अमृता रसाळ, डॉ. अजित दळवी, डॉ. पूनम निहाटकर आणि डॉ. प्राची पंडीत आदी.४. खारेगाव: डॉ. राज पाठक , डॉ. संदेश केणे, डॉ. चेतन भानुशाली, डॉ. वैभव राणे, डॉ. शैलेश शुक्ला आणि डॉ. माधवी खेडेकर आदी५. शांतीनगर (कळवा रेल्वे स्टेशन): डॉ. शैलेश गगे, डॉ. कोष्टी, डॉ. अरुणा वर्मा आणि डॉ. रेषा जाधव.६. विटावा सेंटर: डॉ. सुधीर गायकवाड, डॉ. पडवळ, डॉ. मानवडकर, डॉ. संतोष ठाकरे, डॉ. विनोद पाटील, डॉ. कमलेश पाटील, डॉ. गणेश जगताप आणि डॉ. योगेश कोळी.७. भास्कर नगर:डॉ. सुभाष बडे, डॉ.सुनिल गुप्ता, दिनेश यादव आणि डॉ. संकेत पाटील तर आठव्या घोलाईनगर केंद्रातून डॉ. प्रशांत सकपाळ, डॉ. राहूल पाटील, डॉ. प्रविण ढेंढे, डॉ. अभिनंदन मिश्रा, डॉ. हेमलता चौधरी आणि विनोद मौर्य या सहा डॉक्टरांचे पथक राहणार आहे. अशा आठ ठिकाणी हे केंद्र नागरिकांना सेवा देणार आहेत.

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या