शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आठ तासांच्या प्रवासामुळे प्रवासी वैतागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:57 IST

उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.

कुमार बडदे मुंब्रा : खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या मुंब्रा येथील नागरिकांना प्रवासाकरिता आठ तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे. या प्रवासामुळे त्यांच्या शारीरिक क्षमतेवर विपरित परिणाम होत असल्याने ते कमालीचे त्रस्त झाले आहेत. रेल्वेने केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची सुविधा दिली आहे. उर्वरित कर्मचा-यांना रस्ते मार्गे प्रवास करावा लागत असल्याने त्यांची कोंडी झाली आहे. राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी ते करत आहेत.सध्या सुरू असलेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत फक्त अत्यावश्यक सेवेत काम करत असलेल्यांनाच प्रवास करण्याची सवलत दिली आहे. यामुळे मुंबईतील विविध भागांमधील दुकाने तसेच इतर खाजगी क्षेत्रात काम करत असलेल्या मुंब्रा-कौसा परिसरातील हजारो कर्मचारी तसेच व्यावसायिक यांना रेतीबंदर येथील चौकातून सुटणाºया बेस्टच्या बसने प्रवास करावा लागत आहे. बेस्टची मार्ग क्रमांक ४९४ ही बस मुंबईतील घाटकोपर बसडेपो पर्यंत धावते. या बसची संख्या प्रवाशांच्या तुलनेत कमी आहे. यामुळे सकाळी बससाठी अर्धा ते एक किलोमीटर रांग लागते. बस सुटण्याच्या ठिकाणी निवाºयाची व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना भर पावसात दीड ते दोन तास उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. यामध्ये महिला, वृद्ध आणि मुलांची आबाळ होते. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.>बससाठी दोनदा रांग लावण्याची येते वेळबेस्ट बसने विक्रोळी तसेच घाटकोपरपर्यंत प्रवास केल्यानंतर इच्छितस्थळी जाण्यासाठी पुन्हा दुसºया बसने प्रवास करावा लागतो. त्यासाठी पुन्हा दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागते. परतीच्या प्रवासातही हाच द्राविडी प्राणायाम करावा लागतो. यामुळे प्रवासासाठी दररोज आठ तास खर्च करावे लागतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासात वेळ खर्च होत असल्याने त्याचा परिणाम शारीरिक क्षमतेवर होत असल्याची तक्रार मोहम्मद साजिद आणि मोहम्मद अब्बासी या प्रवाशांनी ‘लोकमत’कडे केली.