शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

फटाक्यांमुळे आगीच्या आठ घटना, सुदैवाने जीवित हानी नाही

By अजित मांडके | Updated: November 13, 2023 15:40 IST

गी नियंत्रणात आणण्यासाठी अर्धा आणि एक तासांचा कालावधी लागला.

ठाणे : कुठे ताडाच्या तर कुठे माडाच्या (नारळ) झाडाला तसेच ताडपत्री आणि कचऱ्यासह कबुतरांचा जाळीला दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे रविवारी दिवसभरात फटाक्यांमुळे तब्बल आठ आगी लागल्याचा घटनांची नोंद ठाणे महापालिका आपत्ती कक्षेत झाली आहे. त्या सर्व घटना जरी  किरकोळ असल्या तरी त्या आगी नियंत्रणात आणण्यासाठी अर्धा आणि एक तासांचा कालावधी लागला. तर, एका घटनेत मात्र ताडपत्रीखाली दुरुस्तीसाठी उभ्या केलेल्या खासगी बसच्या काचेचा तडा गेला आहे. तसेच सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. अशी माहिती आपत्ती कक्षाने दिली.

       दिवाळी पहाट होण्यापूर्वीच वाघबीळ शिवकृपा नगर येथे रविवारी मध्यरात्री १२ वाजून आठ मिनिटांनी  नारायण पाटील यांनी तातपुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या लाकडी बांबुच्या शेडवरील प्लास्टिक ताडपत्रीला व काही मंडप साहित्याला आग लागली. या आगीवर २० मिनीटात नियंत्रण मिळविण्यात यश आले. 

तसेच दुसरी घटना, वागळे इस्टेट, मेंटल हॉस्पिटलच्या आवारामधील एका ताडाच्या झाडाला आग लागल्याची घटना सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग ही अर्ध्यातासात नियंत्रणात आणण्यात यश आले. तिसरी घटना रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास कळवा पारसिक नगर या ठिकाणी कचऱ्याला आग लागली होती. ही आग ही नियंत्रणात आणण्यासाठी अर्ध्यातासांचा कालावधीत लागला. चौथी घटना आझाद नगर, ब्रम्हांड रोड येथे रात्री सव्वा नऊ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मोकळ्या मैदानातील कचऱ्याला व महावितरणच्या विद्युत केबलला आग लागली होती. ही आग ही अर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. तर पाचवी घटना ही रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ढोकाळी,या ठिकाणी असलेल्या हायलँड गार्डन, बी २ इमारतीच्या तेराव्या मजल्यावरती महेश कुमार यांच्या मालकीच्या रूम नंबर १३०३ मधील खिडकी मध्ये ठेवण्यात आलेल्या पिजन नेट व इतर पेपर साहित्याला आग लागली होती. ही आग जवळपास तासाभराने नियंत्रणात आणण्यात यश आले.

सहावी घटना  राबोडी, वृंदावन सोसायटी या ठिकाणी असलेल्या नारळाच्या झाडाला रात्री पावणे सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग पंधरा ते २० मिनिटात नियंत्रणात आली. सातवी घटना ही वागळे इस्टेट, रामनगर येथे सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास कचऱ्याला आग लागली. या आगीवर ही नियंत्रण मिळविण्यासाठी एक तासांचा कालावधी लागला. तर आठवी घटना ही बाळकुम, दादलानी पार्क येथील सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास मे.धर्मेंद्र कुमार मोटर गॅरेजच्या शेडवरील ताडपत्रीला आग लागली.या घटनेत दुरुस्तीसाठी शेड खाली उभी करण्यात आलेली खासगी बसच्या पुढील बाजूच्या काचेला तडे जाऊ. किरकोळ नुकसान झाले आहे. ही आगअर्ध्या तासात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. या आठ ही घटनांमध्ये कोणालाही दुखापत झालेली नसून या आगी फटक्यांनी लागल्याची शक्यता ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :fire crackerफटाके