शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मुलीवरच चाकूच्या धाकावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न: झटापटीत पिता जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 18:00 IST

पोटच्याच मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करणारा पिता मुलीशी झालेल्या झटापटीत चाकू लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याच्याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देसोमवारी रात्रीच्या घटनेने नौपाडयात खळबळपत्नीने घेतला १५ वर्षांपूर्वीच घटस्फोटआरोपी पित्यावर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु

ठाणे: स्वत:च्याच १७ वर्षीय मुलीवर चाकूच्या धाकाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न पाचपाखाडीतील एका पित्याने केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. या झटापटीत तोच चाकू त्याच्या पोटाला लागल्यामुळे त्याला मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

यातील आरोपी व्यसनाधीन असल्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून गेली आहे. बारावीमध्ये शिकण-या या मुलीसोबत तो पाचपाखाडी परिसरात वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री ती झोपेत असतांनाच त्याने तिच्याशी झटापट केली. नंतर त्याने अचानक चाकूच्या धाकावर तो तिच्याशी कुकर्म करण्याच्या प्रयत्नात होता. त्याचवेळी दोघांमध्ये झालेल्या झटापटीत वडीलांच्या हातातील चाकू तिने हिसकविण्याचा प्रयत्न केला. या धुमश्चक्रीत त्याच्या पोटाला चाकू लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. पोटातील आतडेही बाहेर आल्यामुळे तिथे जमलेल्या रहिवाशांनी त्याला तातडीने सुरुवातीला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालयात दाखल केले आहे. या मुलीने दिलेल्या तक्रारीवरुन पित्याविरुद्ध विनयभंगासह पॉस्को (लहान मुलांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा) कायद्यांतर्गत मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे. ती अडीच वर्षांची असतांना तिची आई पतीपासून विभक्त झाली. नंतर तिने याच्याशी घटस्फोट घेऊन दुसरा विवाह केला. त्यामुळे घरी वडील आणि पिडीत मुलगी असे दोघेच वास्तव्याला होते. तिचे वडील तिच्यावर नेहमी संशय घेत असत. ती आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर फिरायला गेल्यानंतरही तो तिच्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करीत असे, असेही तिने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तृप्ती खळदे या अधिक तपास करीत आहेत. त्याची प्रकृती सुधारताच त्याला अटक करण्यात येईल, असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे