शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सातवीपर्यंत शिक्षण ते पैशांचा पाऊस...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2021 00:16 IST

काेट्यवधींमध्ये लोळणाऱ्या भोंदूबाबाचा थक्क करणारा प्रवास

रवींद्र साळवेमोखाडा : मुंबईपासून १०० किमी अंतरावर आदिवासी दुर्गम खोऱ्यात विखुरलेला मोखाडा तालुक्यातील आदिवासी बांधव आजही सोयी-सुविधांपासूनच वंचित आहे. अनेक उच्चशिक्षित तरुणांच्या हाताला काम नसल्याने बेरोजगार आहेत. परंतु असे असताना जेमतेम सातवीपर्यंतचे शिक्षण असतानाही ‘पैशांचा पाऊस’ या बनवाबनवीच्या बोगस धंद्यामुळे काेट्यवधींमध्ये लोळणाऱ्या कृलोद येथील रमेश राथड या भोंदूबाबाचा प्रवास थक्क करणारा आहे.

घरातील परिस्थिती दारिद्र्याची, कुटुंबामध्ये उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही, शेतीवर कशीबशी उपजीविका सुरू होती. यानंतर रमेश राथड या इसमाने लोकांना जडीबुटी आयुर्वेदिक औषधे देतो, तुम्ही मला पैसे द्या, या आधारावर माया गोळा करायला सुरुवात केली. परंतु अपेक्षेपेक्षा जास्त कमाई होत नसल्याने झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग अवलंबून दुप्पट पैसे करून देणे, पैशांचा पाऊस पाडणे, असा गोरखधंदा त्याने सुरू केला. यावेळी त्याने लोकांना लुबाडणारी एक टोळी सक्रिय केली. गेल्या सात ते आठ वर्षांत या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा चुना लावला आहे.पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून पैशांचा पाऊस पाडण्याचा विधी (पूजा) करण्याची तारीख जाहीर करतो आणि रात्री घरामध्ये अंधारात पूजेला बसतो. ग्राहकांना काही अंतरावर ठेवतो, पैसे पाडायला सुरुवात होताच पोलीस येतात व पळापळ सुरू होते. भोंदूबाबा व ग्राहक पळून जातात आणि बनावट पोलीस पैसे घेऊन निघून जातात. नंतर भोंदुबाबा पैसे वाटून घेतो. अशा पद्धतीने कधी पोलिसांच्या आशीर्वादाने, तर कधी बनावट पोलीस भासवून राजरोसपणे हा खेळ चालत असे.

दरम्यान, ११ जानेवारी २०२० रोजी मोखाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन वाडा तालुक्यातील ४ तरुणांना पोलिसांनी गजाआड केले. त्या वेळेस पालघर क्राईम पोलिसांनी लाखो रुपयांच्या खोट्या नोटा वाडा तालुक्यातील एका गावातून जप्त केल्या. मात्र, या गुन्ह्याचा तपास झाला नाही. हे प्रकरण दडपले गेले, अशी अनेक प्रकरणे याअगोदर दाबली गेली आहेत. परंतु आता मात्र या भोंदुबाबाचे बिंग फुटले असून, कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या तत्परतेमुळे मोखाडा पोलीस ठाण्यात या भोंदुबाबावर जादूटोण्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी