शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण समिती सभापती वैजयंती गुजर घोलप यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द, उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 17:40 IST

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती व माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी सादर केलेले जात वैधता प्रमाण पत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे.

कल्याण : कल्याण- डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण समिती सभापती व माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांनी सादर केलेले जात वैधता प्रमाण पत्र उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. कोकण विभागीय जात पडताळणी समितीने वैजयंती गुजर घोलप यांच्या जात वैधता प्रमाणपत्रची वैधता पुन्हा तपासावी असे आदेश कोकण विभागीय जात वैधता समिताला उच्च न्यायालयाने दिले आहे. कोकण विभागीय समितीचा अहवाल येई पर्यंत वैजयंती गुजर घोलप यांचे नगरसेवक पद कायम राहणार आहे. 2015 साली पार पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 26 मधून वैजयंती गुजर घोलप या चौथ्यांदा नगरसेविकापदी निवडून आल्या होत्या. त्यांच्या विरोधात भाजपा उमेदवार गौरक गुजर यांनी निवडणूक लढविली होती. गौरव गुजर यांचा पराभव झाला होता. वैजयंती या जातीने खाटीक आहेत. मात्र त्यांनी धनगर या जातीचा उल्लेख करुन ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असलेल्या प्रभागातून निवडणूक लढविली होती. त्याच आधारे त्यांना महापौर पदही मिळाले होते. त्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रला आव्हान देणारी याचिका गौरव गुजर यानी उच्च न्यायालयात दाखल केली होती. माहितीच्या अधिकारात त्यांनी वैजयंती यांचे व्हिजिलन्स रिपोर्ट सरकारकडून मागविले होते. या रिपोर्टच्या आधारे उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी दरम्यान वैजयंती यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरविले आहे. हे प्रमाणपत्र कोकण विभागीय जात पडताळणी समितीने दिले असल्याने समितीने पुन्हा त्याची तपासणी करावी, असे न्यायालयाने समितीला सूचित केले आहे. गौरव यांच्या मते वैजयंती यांनी कायदेशीर प्रक्रिया पार न पाडताच जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर केले होते. त्यालाही गौरव यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला होता. जात वैधता प्रमाणपत्र पुन्हा तपासणी होईपर्यंत वैजयंती यांचे नगरसेवक पद कायम राहणार आहे. दरम्यान या संदर्भात वैजयंती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. 

टॅग्स :Courtन्यायालय