शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
2
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
3
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
4
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
5
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
6
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
7
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
8
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
9
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
10
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
11
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
12
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
13
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
14
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
15
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
16
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
17
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
18
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
19
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला
20
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय

चेणे येथील लक्ष्मी नदीवर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामास इको सेन्सेटिव्ह झोन समितीची परवानगी

By धीरज परब | Published: March 16, 2024 7:45 PM

लक्ष्मी नदीवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट द्वारे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचे केंद्र विकसित करावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे चालवलेल्या पाठपुराव्या नंतर सदर प्रकल्पास व ५० कोटी निधीला सरकारने मान्यता दिली.

मीरारोड -  गुजरातच्या  साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलमेंटच्या धर्तीवर घोडबंदर मार्गवरील चेणे येथील लक्ष्मी नदीवर रिव्हर वॉटरफ्रंट डेव्हलमेंटच्या कामास पर्यावरण संवेदनशील क्षेत्र सनियंत्रण समितीची परवानगी मिळाली आहे. ५० कोटींचा खर्च असलेल्या प्रकल्पाला याआधीच राज्य सरकारने मान्यता दिली असल्याची माहिती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. यामुळे निसर्गाच्या कुशीत नदीचे सौंदर्यीकरण सह पर्यटनाला चालना मिळणार असून महाराष्ट्र राज्यातील हा पहिला रिव्हर डेव्हलपमेंट प्रकल्प ठरणार आहे. 

लक्ष्मी नदीवर वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट द्वारे सौंदर्यीकरण करून पर्यटनाचे केंद्र विकसित करावे यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे चालवलेल्या पाठपुराव्या नंतर सदर प्रकल्पास व ५० कोटी निधीला सरकारने मान्यता दिली. पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपये निधी महापालिकेकडे वर्ग करण्याचा शासन निर्णय झाला. 

महानगरपालिकेने वन विभागाकडे इकोसेन्सेटिव्ह झोनची परवानगी मागितली असता ठाणे वन विभागाच्या उप वनसंरक्षक यांनी महापालिकेला पत्र पाठवून समितीने परवानगी दिल्याचे कळवले.  नदीचे सौंदर्यीकरण करण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया महापालिकेने आधीच केली आहे. इको सेन्सेटिव्ह झोनची परवानगी मिळाल्याने आता रिव्हर फ्रंट विकासाचे काम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहेअशी माहिती आ. सरनाईक यांनी दिली.

नदी किनारा विकास असा होणार

नदीवर पावसाळ्यात अनेक जण निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी येतात.  किनाऱ्यावर पायऱ्या बनवल्या जातील,  पर्यटकांना फिरण्यासाठी बसण्याची सोय असेल. आकर्षक लायटिंगपर्यावरणाचा विचार करून गार्डन असे निसर्ग सुख पर्यटकांना अनुभवता येईल.  लक्ष्मी नदी ठाणे आणि मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने येथे हा रिव्हर फ्रंट विकसित झाल्यास मीरा भाईंदरच्याच नव्हे तर ठाणेमुंबईच्या नागरिकांना देखील आनंद घेता येईल . चेणेच्या ह्या लक्ष्मी नदीच्या परिसरात पूर्वी अनेक गाजलेल्या चित्रपटांचे शुटींग झाले आहे.  पर्यटक  वाढल्यास  स्थानिक आदिवासीआगरी व इतर भूमिपुत्रांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील असे आ . सरनाईक यांनी सांगितले .