शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उग्र वासाने डोंबिवली त्रस्त, उलटी, डोकेदुखी, जुलाब, मळमळण्याचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 01:18 IST

एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत.

डोंबिवली : एमआयडीसी विभागातील सागाव, सागर्ली आणि सोनारपाडा परिसरातील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासाने भयभीत झाले आहेत. उलटी, जुलाब, डोकेदुखी, डोळे चुरचुरणे तसेच मळमळ अशा आजारांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. केमिकल कंपन्या कोणतीही प्रक्रिया न करताच त्यांचे सांडपाणी थेट नाल्यात सोडत असल्याचा आरोप रहिवाशांचा असून संबंधित कंपन्यांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी नाल्यातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. यावरून कोणत्या कंपनीचे केमिकल नाल्यात सोडण्यात आले होते, हे स्पष्ट होणार आहे.एमआयडीसी परिसरात राहणाºया रहिवाशांना वायुप्रदूषण नवीन नाही; पण फेज-२ मधील सागाव, सागर्ली आणि सोनारपाड्यामधील रहिवासी दोन दिवसांपासून केमिकलच्या उग्र वासामुळे पुरते हैराण झाले आहेत. यात या वासामुळे त्यांचे आरोग्य बिघडल्याने स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या मनीषा राणे, रमेश मिश्रा आदी मंडळींनी शनिवारी रात्री त्या परिसराला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. दिवसाही केमिकलचा उग्र वास येत असल्याचे रहिवाशांनी सांगितले. या वासामुळे जीव घुसमटत असून चक्कर, डोकेदुखी, उलट्या आदी त्रास होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.दोन, तीन दिवसांपासून हा त्रास अधिक जाणवू लागला आहे. हे थांबले नाही, तर झोपेतच आमचे जीव जातील, अशी भीतीही रहिवाशांनी व्यक्त केली. ज्या नाल्यातून केमिकल सोडण्यात आले होते, तेथील पाण्याचे नमुने सीईटीपीच्या अधिकाºयांनी घेतल्याची माहिती स्थानिक रहिवासी संदीप नाईक यांनी दिली. आम्हीही नमुने घेतले असून त्याचीही तपासणी केली जाणार आहे. तसेच यासंदर्भात स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात पत्रदेखील दिले असून यात जी कंपनी दोषी आहे, तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आल्याचे नाईक म्हणाले. दरम्यान, सीईटीपीचे देवेन सोनी यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.>हिरव्या पावसाचा आज नोंदवणार निषेध२१ जानेवारी २०१४ ला सकाळी७ च्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी भागात पडलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वत्र हिरव्या रंगाची चादर पसरली होती. हा प्रकार त्यावेळी खूपच गाजला होता. प्रदूषण केल्याप्रकरणी एका कंपनीवर कारवाईही करण्यात आली. संबंधित कंपनीला इंजिनीअरिंग वस्तू बनवण्याची परवानगी असताना तिथे बेकायदा रासायनिक रंग बनवले जात होते. याचे कण हवेत जाऊन त्यावर पावसाचे पाणी पडल्याने सर्वत्र हिरवा रंग दिसून आला होता. हे चित्र एमआयडीसीतील सर्वच रस्ते तसेच इमारतींमधील टेरेसवर पाहावयास मिळाले होते.दरम्यान, या घटनेची आठवण म्हणून दरवर्षीप्रमाणे सोमवारीही निषेध दिन पाळला जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी दिली. सोमवारी फलकाद्वारे याचा निषेध नोंदविला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.