शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

कल्याण डोंबिवली महापालिकेतील महिला अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 5:25 PM

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूच्या तापाने शुक्रवारी मृत्यू झाला. 

ठळक मुद्दे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूच्या तापाने शुक्रवारी मृत्यू झाला. सिंघासने या सोमवारपासून आजारी होत्या.

कल्याण- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी श्वेता सिंघासने यांचा डेंग्यूच्या तापाने शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कारक करण्यात आले.

सिंघासने या सोमवारपासून आजारी होत्या. त्यांना ताप येत होता. तापानंतर त्यांच्या आजाराचे निदान करण्यात आले. त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. त्या अंबरनाथ येथे राहत होत्या. त्यांना उपचारासाठी प्रथम अंबरनाथ येथील खाजगी रुग्णालयात नंतर कल्याणच्या बड्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सिंघासने या महापालिकेच्या लेखा विभागात कार्यरत होत्या. त्यांनी काही काळ महापालिकेच्या फ प्रभाग कार्यालयाच्या प्रभाग अधिकारी पदाचा कार्यभार संभाळला होता. डें

ग्यूमुळे महापालिकेतील महिला अधिकारी सिंघासने यांचा मृत्यू झाल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. महापालिका हद्दीत डेंग्यूचे रुग्ण मिळून येतात. आरोग्यविषयी अनास्था असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य विषय काळजी घेतली जात नसल्याने नागरीकांचा डेंग्यूमुळे मृत्यू होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता डेंग्यूचा बळी एक महिला अधिकारी झाली आहे. यासंदर्भात महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, सिंघासने या अंबरनाथ येथे राहत असल्याने ही डेंग्यूची केस कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील नाही, असं म्हंटलं. मात्र सिंघासने यांचा डेंग्यूने मृत्यू झाला असल्याचे खाजगी रुग्णालयाने महापालिकेस कळविले आहे.