शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
3
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
4
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
6
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
7
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
8
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
9
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
10
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
11
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
12
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
13
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
14
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
15
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
16
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
17
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
18
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
19
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
20
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान

उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, संतप्त जमावाचा पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 9:25 PM

कल्याण:  येथील पश्चिमेकडील होली क्रॉस या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

कल्याण:  येथील पश्चिमेकडील होली क्रॉस या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणाच्या मृत्यू झाल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावरही संतप्त झालेल्या जमावाने सशस्त्र हल्ला केला. यात बेटावदकर गंभीर जखमी झाले आहेत.ही घटना पाहता रुग्णालयासह पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे. कल्याण तालुक्यातील म्हारळ गावात राहणा-या रोहित भोईर या तरुणाच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी रविवारी होलीक्रॉस या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सोमवारी दुपारी त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रोहितचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली.दरम्यान रोहितच्या मृत्यूचे वृत्त वा-यासारखे पसरताच तब्बल 100-200 जणांच्या जमावाने रुग्णालयावर धडक देत तेथील सामानांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. रुग्णालयातील तीन मजल्यांवरील सामानांची तोडफोड करताना जमावाने अतिदक्षता विभागही सोडला नाही. याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयात तोडफोड सुरू असल्याची माहिती मिळाल्याने त्या घटनेचे वृत्तांकन करण्यासाठी पत्रकारही गेले. यावेळी पत्रकार केतन बेटावदकर यांच्यावर संतप्त जमावाने हल्ला चढविला. कोणत्यातरी हत्याराने केलेल्या हल्ल्यात बेटावदकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तत्काळ तेथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.रुग्णालयच्या परिसरात शेकडोंच्या संख्येने जमाव जमल्याने पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या पाचारण केल्या. संपूर्ण परिसरात तणाव पसरल्याने पत्रकारांनाही त्याठिकाणी जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तब्बल चार ते पाच तास हा परिसर तणावाखाली होता. दरम्यान रोहितचा मृतदेह ताब्यात मिळताच जमाव तेथून मार्गस्थ झाला. दरम्यान पत्रकार बेटावदकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा ठाणे जिल्ह्यातील सर्वच पत्नकार संघटनांनी निषेध व्यक्त करीत तातडीने हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली आहे. महापौरांनी घटनास्थळी दिली भेटया घटनेची माहीती मिळताच महापौर राजेंद्र देवळेकर आणि शिवसेनेचे गटनेते रमेश जाधव यांनी रूग्णालयात जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली तर पत्रकार बेटावदकरांच्या प्रकृतीची चौकशी केली. 

टॅग्स :kalyanकल्याण