शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन

By जितेंद्र कालेकर | Updated: August 30, 2022 21:13 IST

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असून तो एकप्रकारे वार्षिक महोत्सवच असतो.

ठाणे : कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावाकडे निघाले आहेत. कोकण रेल्वेने गावी जाण्यासाठी मुंबई, ठाण्यात हजारोंच्या संख्येने प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडत आहे. ठाणे रेल्वे स्थानकात तर कोकणातील गावी जाणाऱ्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्यावतीने मेंगलोर एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस आणि तुतारी या गाड्यांसाठी प्रवाशांच्या रांगा लावून दररोज उत्तम नियोजन केले जात असल्याने चाकरमान्यांना उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे.

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असून तो एकप्रकारे वार्षिक महोत्सवच असतो. या काळात चाकरमानी आपापल्या मुळ गावी कुटूंबीयांसह मिळेल त्या वाहनाने तसेच रेल्वेने जात आहेत. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणवासिय आपल्या गावच्या विविध सण-उत्सवांना मुकले होते. आता कोरोना प्रादूर्भाव घटल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

कोविड प्रतिबंध नसल्याने गावी जाण्यासाठी ठाणे रेल्वे स्थानकात चाकरमान्यांची माेठी गदीर् हाेत आहे. कोकणात मार्गस्थ होणाऱ्या मेंगलोर एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस आणि तुतारी एक्सप्रेस या गाड्यांसाठी ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर गेले काही दिवस चाकरमान्यांची गर्दी वाढली. कोकणातील गाड्यांच्या जनरल अनारक्षित बोगीतून प्रवास करण्याची मुभा अाहे. त्यामुळे दोन दिवस आधीच स्थ ानकात रांगा लावल्या जातात. याचे सर्व नियोजन कोकण रेल्वे प्रवासी संघाचे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे स्वेच्छेने विनामोबदला करीत आहेत. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाचे प्रमुख मार्गदर्शक राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, माजी अध्यक्ष संतोष पवार, खजिनदार संभाजी ताम्हणकर,दर्शन शेटये आिण सुनिल गुरव आदींसह अनेक पदाधिकारी नियमितपणे हे काम करीत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनालाही सुव्यवस्था राखण्यात संघटनेचा हातभार लागत आहे.

ठाणे स्थानकात गणेशाेत्सवासाठी कोकण रेल्वेने गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची झुंबड उडत आहे. यासाठी, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाच्या माध्यमातून दोन दिवस आधीच रांगेची यादी तयार केली जाते. यात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार प्रवाश्ाचे नाव व सहप्रवाश्यांची संख्या यादीमध्ये नोंदवली जाते. प्रवासाच्या दिवशी प्रत्यक्ष रांग लावून सर्वाना शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत ठाणे बोगीमध्ये प्रवेश दिला जातो.- सुजित लोंढे, अध्यक्ष कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkonkanकोकण