शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मोबाइल चोरणाऱ्या दुकलीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 22:58 IST

ठाण्याच्या वागळे इस्टेट परिसरात मोटारसायकलीवरुन येऊन पायी जाणाऱ्यांच्या हातातील मोबाईल जबरीने हिसकावून पळ काढणा-या एका दुकलीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया शिताफीने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

ठळक मुद्दे१३ मोबाइल हस्तगत मोटारसायकलवरुन येऊन जबरीने चोरी करायचे वागळे इस्टेट पोलिसांची कारवाई

ठाणे : मोटारसायकलवरून येऊन वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर परिसरातील पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून पळ काढणा-या अविराज यादव (२०, श्रीनगर, वागळे इस्टेट, ठाणे) आणि सुमित ऊर्फ गोरू भुंबक (१९, रा. वाल्मीकीपाडा, वागळे इस्टेट, ठाणे) या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ५४ हजारांचे  १३ मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.मुंबई-अहमदाबाद पूर्व दु्रतगती महामार्गालगतच्या सेवारस्त्यावरून शिवबदन विश्वकर्मा (३४, रा. सावरकरनगर, ठाणे) हे २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी एका स्कूटीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यांच्या हातातील सात हजारांचा मोबाइल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर या परिसरांमध्ये मोटारसायकलवरून येत पायी जाणाºया नागरिकांचे मोबाइल जबरीने चोरून त्यांची विक्री करून मौजमजा करणा-या दुकलीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे यांचे पथक तपास करत असताना दोघेजण एका स्कूटीवरून वागळे इस्टेट, बीअर कंपनीजवळून संशयास्पदरीत्या जाताना आढळले. त्यांना बोलते केल्यानंतर अविराज आणि सुमित अशी त्यांची नावे सांगितली. त्यांनी सेवारस्त्यावरील जबरी चोरीची कबुलीही दिली. जबरी चोरीसाठी वापरलेली स्कूटीही पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केली आहे. त्यांनी वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तकनगर या भागांतून अशा प्रकारचे १२ मोबाइल जबरीने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांचे दोन लाख ५४ हजारांचे १३ मोबाइल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांनी आणखीही गुन्हे केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्यांच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी