उल्हासनगर : कॅम्प नंबर ३ येथील सम्राट अशोकनगरमध्ये शुक्रवारी सकाळी एका पिसाळलेल्या कुत्र्याने ७ मुलांना चावा घेतला. त्यापैकी दोन मुले गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या कुत्र्याला श्वान पथकाने पकडले आहे.सम्राट अशोकनगरमध्ये ५ ते १0 वयोगटातील मुले रस्त्यावर खेळत होती. त्यावेळी पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना चावे घेण्यास सुरुवात केली. मुले इकडे तिकडे पळत सुटली. आरुषी यादव, दक्ष रोकडे, रोशनी गवई, विवेक पालिवाट, मानसी धोडे, दीपक जावा व कुणाल चव्हाण यांना कुत्र्याने चावा घेतला असून त्यापैकी दोन जणांना गंभीर दुखापत झाली. स्थानिक नगरसेविका सविता तोरणे रगडे, समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मुलांच्या उपचारवर लक्ष देऊन, पिसाळलेल्या कुत्र्याला लांब सोडण्यास श्वान पथकाला सांगितले.
भटक्या कुत्र्याचा सात मुलांना चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 01:03 IST