शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दुकलीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 01:43 IST

वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून ती परस्पर दुसºयालाच कोणतेही कागदपत्रे न बनविताच फसवणूक करणाºया टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे.

ठळक मुद्देठाणे गुन्हे शाखेची कारवाईतीन वाहने हस्तगत

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाहनांची विक्री करुन देण्याचे अमिष दाखवून ती परस्पर दुसºयालाच कोणतेही कागदपत्रे न बनविताच फसवणूक करणाºया टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून एका मर्सिडीज मोटारकारसह तीन वाहने जप्त केली आहेत.डोेंबिवतील मानपाडा पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०१९ रोजी असाच प्रकारे फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील एक इनोव्हा क्रिस्टा कार ही तक्रारदाराला विश्वासात घेऊन दुसºयाच गिºहाईकाला विक्री करुन देतो, अशी बतावणी करुन परस्पर तिची दुसºयाच पार्टीला विक्री करुन कमलेश जाधव नावाच्या व्यक्तीने फसवणूक केल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती. त्याच आधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनराव, सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे आणि हवालदार संदीप शिर्के आदींच्या पथकाने कमलेश जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला २२ आॅगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्याला ३० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यातील कार ही रायगड जिल्यातील करंजडे (ता. पनवेल) येथे राहणाºयास १३ लाख रुपयांमये विक्री केली होती. ही कार त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या कौशल्यपूर्ण चौकशीमध्ये त्याने त्याचा साथीदार वसीम कुरेशी याच्यासह अशा प्रकारे ११ मोटार कारची मुळ मालक आणि दुसºया पार्टीला विक्री केलेल्या व्यक्तींची फसवणूक केल्याचेही उघड झाले. यामध्ये एका मर्सिडीज कारचाही समावेश आहे. यातील एका मर्सिडीजसह तीन मोटारकार जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मानपाडा, मुंबईतील चेंबूर आणि पालघरमधील विरार पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.उर्वरित आठ वाहनांच्या मुळ मालकांचा तसेच ज्यांना विक्री केली आहेत, त्या कार चालकांचा शोध घेतला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी