शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्य मेडीकल फाऊंडेशनने केला अटी आणि शर्तींचा भंग, महासभेत भाजपाने केले गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 16:11 IST

कौशल्य मेडीकल फाऊंडेशन बरोबर करण्यात आलेला करार चुकीचा असून त्यांच्याकडून नियम व अटींचा भंग झाल्याचा आरोप भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करुन पुढील महासभेत अहवाल सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांंनी प्रशासनाला दिले.

ठळक मुद्देएका संस्थेला एक न्याय दुसऱ्या संस्थेला दुसरा न्यायएक इमारत असतांना दुसऱ्या इमारतीचे काम सुरु

ठाणे - ठाणे महापालिकेने ९९ वर्षाच्या करारावर दिलेल्या कौशल्य मेडीकल फाऊंडेशनच्या (हॉस्पीटल) मुद्यावरुन गुरुवारी झालेल्या महासभेत बराच गोंधळ उडाला. संबधींतानी अटी आणि शर्तींचा भंग तर केला आहेच, शिवाय ओसी दिली असतांनाही बाजूलाच नवीन एनेक्स इमारत बांधण्याचे काम सुरु असल्याचा आरोप भाजपाचे गटनेते नारायण पवार यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबधींतावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. पिठासीन अधिकारी तथा महापौर मीनाक्षी शिंदे यांनी सुध्दा या प्रकरणाची गंभीर दखल घेत, या संदर्भातील अहवाल एका महिन्याच्या आत पुढील महासभेत सभागृहासमोर आणावा आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी असे स्पष्ट आदेश दिले.                      गुरुवारी झालेल्या महासभेत पवार यांनी प्रश्नोत्तरांच्या तासाला कौशल्या मेडीकल फाऊंडेशनला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या हॉस्पीटलचा मुद्दा चांगलाच लावून धरला. या संस्थेबरोबर किती वर्षांचा करार करण्यात आला होता, बाजारभावानुसार भाडे वसुल केले जाते का? असे काही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यानुसार संबधींत संस्थेबरोबर ९९ वर्षांचा करार करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली. तर दर ३० वर्षांसंदर्भातील भाडेवाढी संदर्भातील करारही करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. परंतु एका संस्थेला एक न्याय आणि दुसऱ्या संस्थांना ३० वर्षांच्या कराराचा न्याय ही कोणती पध्दत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच पालिकेने ज्या काही अटी शर्ती घालून दिल्या होत्या, त्याचे उल्लंघनसुध्दा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर बाजारभावानुसार भाडे वसुल होते किंवा नाही, याबाबतही योग्य उत्तर प्रशासनाला देता आले नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी या इमारतीच्या बाजूला सध्या एनेक्स इमारतीचे काम सुरु असून त्याला परवानगी घेण्यात आली आहे का? असा सवाल उपस्थित केला. तर याच मुद्याला हात घालत पवार यांनी या संपूर्ण इमारतीला ओसी देण्यात आली होती, तर आता नवी इमारती कशी काय उभी राहत आहे, असा सवाल उपस्थित करुन प्रशासनाला चांगलेच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानुसार या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन त्याचा लेखी अहवाल पुढील महासभेत सादर करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBJPभाजपा