शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमुळे शिवसेनेला दुहेरी लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:54 IST

भाजपामध्ये मात्र या वृत्तामुळे कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

कल्याण : उल्हासनगरमधील माजी आमदार कुमार आयलानी आणि ओमी कलानी यांच्या टीममध्ये भडकलेल्या राजकीय युद्धात तेथील सत्तेत शिवसेनेला वाटा मिळणार असतानाच कल्याण-डोंबिवलीचे महापौरपदही सलग पदरात पडणार असल्याने शिवसेनेला दुहेरी लॉटरी लागल्याचे चित्र निर्माण झाल्याने त्या पक्षाच्या गोटात दिवसभर आनंदाचे वातावरण होते.भाजपामध्ये मात्र या वृत्तामुळे कमालीची अस्वस्थता पसरली आहे. युतीच्या वाटाघाटीत वरिष्ठांनी जे ठरवले आहे, त्याप्रमाणे होईल, असा दावा करून भाजपा नेत्यांनी ती लपवण्याचा प्रयत्न केला. पण महापौरपदाच्या बदल्यात अन्य पदे मिळवून सत्ता समतोल राखावा, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. या घडामोडींमुळे महापौरपदासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपातील खुल्या गटातील महिला नगरसेविकांच्या हालचाली एकदम थंडावल्या, तर शिवसेनेतील विविध नेत्यांची आपल्या पत्नीसाठीची फिल्डिंग सुरू झाली.केडीएमसीत शिवसेना ५३, भाजपा ४३, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २, मनसे ९, बसपा १, एमआयएम १ आणि अपक्ष ९ असे पक्षीय बलाबल आहे. २०१५ च्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलेल्या शिवसेना आणि भाजपाने एकत्र येत सत्ता स्थापन केली. सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेला पहिली अडीच वर्षे महापौरपदाचा मान मिळाला. उर्वरित अडीच वर्षातील एक वर्ष भाजपा; तर दीड वर्षे शिवसेनेला मिळणार आहे. १३ मे रोजी महापौरपदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपत आहे. पुढील महापौरपदाचा मान भाजपाचा होता. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापौरपदाची निवडणूक होणार आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या ‘क’ प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपाला दिलेला अनपेक्षित धक्का आणि महापौर निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील नगरसेवकांना शहर सोडून कुठेही न जाण्याचा बजावलेला व्हिप पाहता भाजपामध्ये अस्वस्थता पसरली आहे.उल्हासनगरमध्ये सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘कल्याणच्या महापौरपदाचा दावा भाजपा सोडणार?’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे भाजपामध्ये चिंतेचे वातावरण अधिकच वाढले असताना शिवसेनेत मात्र चैतन्य पसरले आहे.डोंबिवलीतीलमहिलेला संधीभाजपामध्ये महापौरपदासाठी संभाव्य उमेदवार म्हणून खुशबू चौधरी, मनीषा धात्रक, डॉ. सुनीता पाटील, उपेक्षा भोईर यांच्या नावाची चर्चा होती. शिवसेनेमध्ये भारती मोरे, विनीता राणे, वैशाली भोईर यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडे महापौरपद राहिल्यास ते डोंबिवलीच्या वाट्याला जाईल, असे संकेत मिळत आहेत.‘वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कृती होईल’महापौरपदाच्या निवडीबाबत बोलताना शिवसेना गटनेते रमेश जाधव यांनी, शिवसेना हा येथील पक्ष मोठा आहे; तरीही महापौर युतीचा होईल, असे वक्तव्य केले होते. महापौर राजेंद्र देवळेकर यांनीही महापौरपदी कोणाला संधी द्यायची, याचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील, असे स्पष्ट केले आहे.‘सुरुवातीला जे ठरले तेच होईल’शिवसेना-भाजपाची सत्ता स्थापन करताना सुरुवातीच्या वाटाघाटीत जे ठरले आहे, त्याप्रमाणे होईल. वरिष्ठांचे तसे आदेश आहेत. याउपरही शिवसेना जे काही करेल, त्याबाबत पक्षश्रेष्ठी काहीतरी निर्णय घेतीलच, असे मत भाजपाचे उपमहापौर मोरेश्वर भोईर यांनी व्यक्त केले. आमच्या पक्षात चार महिला महापौरपदासाठी इच्छुक आहेत. वरिष्ठ यातील एकीची निवड करतील, असा विश्वास त्यांनी या राजकीय घडामोडींनंतरही व्यक्त केला.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर