शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘आरपीएफ’मुळे परत मिळाले दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 01:45 IST

ठाणे रेल्वेस्थानकावर लोकलची वाट पाहताना अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज विसरलेली बॅग ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे नवी मुंबईच्या नेरूळ येथील देसाई दाम्पत्याला काही तासांतच मिळाली.

ठाणे - ठाणे रेल्वेस्थानकावर लोकलची वाट पाहताना अडीच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज विसरलेली बॅग ठाणे रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या दक्षतेमुळे नवी मुंबईच्या नेरूळ येथील देसाई दाम्पत्याला काही तासांतच मिळाली. ही घटना शुक्रवारी घडली असून विसरलेल्या बॅगेतील वस्तूंची खातरजमा झाल्यावर त्या बॅगेतील ऐवज त्यांच्या स्वाधीन केल्याची माहिती ठाणे आरपीएफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांनी दिली.नेरूळ येथील दत्तप्रसाद देसाई (३२) आणि त्यांची पत्नी संचिता (३०) हे दाम्पत्य शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक-९ येथे लोकलची वाट पाहत बसले होते. लोकल फलाटावर लागताच घाईगडबडीत लोकलमध्ये चढताना संचिता या आपली हॅण्डबॅग विसरल्या.दरम्यान, त्याच फलाटावर गस्तीवर असलेल्या आरपीएफ जवान अरुण कुमार आणि विक्रमाजित या दोघांच्या निदर्शनास ती बॅग आली. त्यांनी ही बाब तातडीने सहायक पोलीस उपनिरीक्षक एस.बी. मेघे यांना सांगितली. बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत पाण्याची बाटली, जेवणाचा डबा, आठ हजार ५०० रुपयांची रोकड, मंगळसूत्र, नेकलेस, दोन बांगड्या, दोन कानांतील रिंगा, दोन रिंगा, चार पेंडण्ट आणि एटीएमकार्ड असा ऐवज मिळून आला.बॅगेमध्ये होते ९० ग्रॅमचे दागिनेसोन्याचे दागिने अंदाजे ९० ग्रॅम वजनाचे असून त्यांची किंमत दोन लाख ५० हजार इतकी आहे. याचदरम्यान देसाई दाम्पत्याला बॅग हरवल्याचे लक्षात येताच त्यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार करणार तोच एक बॅग आरपीएफ पोलिसांना मिळाली असल्याचे सांगितले. आरपीएफमध्ये त्यांनी धाव घेतल्यावर ती त्यांची असल्याचे स्पष्ट झाल्यावर आरपीएफ पोलिसांनी बॅगेतील ऐवजाची खातरजमा झाल्यानंतर ती परत केल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस