शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरवल्याने धरण क्षेत्र अद्याप कोरडेच, भातसा-बारवीसह सर्वत्र पाणीसाठा आटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:30 IST

मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही.

- सुरेश लोखंडेठाणे : ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांमध्ये सोमवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्याने उन्हाच्या काहिलीपासून तात्पुरता दिलासा लाभला असला तरी मुंबई, ठाण्यासह जिल्ह्यातील महापालिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप पाऊस झालेला नाही. मुंबई महानगरास पाणीपुरवठा करणाºया व ब्रिटिशकालीन सर्वाधिक मोठ्या भातसा धरणात मागील पाच वर्षांच्या तुलनेत यंदा अत्यंत कमी म्हणजे २३.१९ टक्के पाणीसाठा आहे. तर, ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिकांना पाणी पुरवणाºया बारवी धरणातही गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत अवघा १४.९० टक्के इतका साठा शिल्लक आहे. अन्यही धरणांमध्ये गेल्या वर्षांच्या तुलनेत कमी साठा शिल्लक असल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात येत्या आठ ते दहा दिवसांत धो धो पाऊस झाल्याखेरीज मुंबई व ठाणेकरांना दिलासा लाभणार नाही. अन्यथा मोठ्या कपातीला तोंड देण्याची पाळी येथील कोट्यवधी लोकांवर येणार आहे.या धरणांमधील पाणीसाठ्याची तूट भरून काढण्यासाठी नोव्हेंबरपासूनच पाणीकपात लागू केली आहे. येत्या १५ जुलैपर्यंत पाणीपुरवठ्याच्या जबाबदारीस अनुसरून जून संपत आला असतानाही तीव्र पाणीकपातीला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाला विलंब झाला आहे. सोमवारी काही ठिकाणी सकाळी पाऊस पडला. पण, आजपर्यंत केवळ २४.३ टक्के पाऊस जिल्ह्यात पडला. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात तर त्याचा अभावच आहे. यंदाच्या तुलनेत गेल्या वर्षी पाऊस सरासरी २८३ मिमी म्हणजे ७७.८ टक्के पडला होता. मात्र, यंदा पाणलोट क्षेत्रात पावसाचे आगमन न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात किंचितही वाढ झालेली नाही.जिल्ह्यातील भातसा धरणात मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा केवळ १४.९० टक्के म्हणजे ३४.७३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. मागील दोन वर्षी आजच्या दिवसापर्यंत ६३.५६ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा शिल्लक होता. याप्रमाणेच आंध्रा धरणात ७२.२५० दशलक्ष घनमीटर म्हणजे २१ टक्के साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी २५.४५ टक्के पाणीसाठा या धरणात होता. या धरणातील पाणी उल्हास नदीद्वारे जिल्ह्यातील महापालिकांना पुरवले जाते. पण, १५ जुलैपर्यंत नक्कीच धरणातील पाणीसाठा वाढेल. याशिवाय, कर्जतच्या डोंगर परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी बारवी धरणाखालून लिफ्ट करून शहरांना पुरवण्यात येणार असल्याचे लघुपाटबंधारे विभागाने सांगितले.ठाणे जिल्ह्यातील शहरांना पाणीपुरवठा करणाºया धरणांच्या क्षेत्रात तर पाऊस झालेला नाही. त्यामुळे आठवडाभरात धरणांच्या क्षेत्रात धो धो पाऊस झाला नाही तर परिस्थिती चिंताजनक होण्याची चिन्हे दिसत आहेत.पावसाच्या हलक्या सरींमुळे दिलासाजून महिना सरत आला तरी पाऊस सुरु न झाल्याने उकाड्याने हैराण असलेल्या ठाणे, कल्याण-डोंबिवली परिसरातील नागरिकांना सोमवारी सकाळी झालेल्या पावसाच्या सरींनी काहीसा दिलासा लाभला. अनेकजण छत्र्या घेऊन घराबाहेर पडले. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडल्याने उकाडा जाणवू लागला. त्यामुळे छत्र्यांचे लोढणे बाळगणे अनेकांच्या वाट्याला आले. मात्र, अद्याप पावसाने जोर धरला नसल्याने चिंता वाढली आहे.

टॅग्स :thaneठाणेdroughtदुष्काळ