शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे वाहतूक पोलिसाच्या कर्तव्य तत्परतेमुळे महिलेचा लॅपटॉप मिळाला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 15:54 IST

रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला.

ठळक मुद्दे अवघ्या दीड तासांतच घेतला शोधपोलीस उपायुक्तांनी केला सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला. जाधव यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचा सत्कार करुन कौतुक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सोमवारी दिली.दादर येथील रहिवासी असलेल्या पारखी या ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात कार्यरत आहेत. त्या १९ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जात होत्या. याच दरम्यान प्रवासात त्यांचा लॅपटॉप गहाळ झाला. त्यांनी बराच शोध घेऊनही तो मिळाला नाही. साडेतीन वर्षांची मेहनत आणि लॅपटॉप मध्ये असलेल्या लहान मुलांच्या उपचाराबाबतचे अनेक प्रोजेक्ट्सचे काय होणार ? या चितेंतच दुसºया दिवशी २० डिसेंबर रोजी त्यांनी नौपाडा येथील समर्थ भांडार वाहतूक नियंत्रण शाखेच्या चौकीजवळ कर्तव्यावर असलेल्या जमादार जाधव यांच्याशी संपर्क साधला. लहान मुलांच्या उपचाराबाबतच्या प्रोजेक्टसची माहिती त्यांना जर्मनीमध्ये सादर करायची होती. त्यामुळे हा लॅपटॉप आणि त्यातील माहिती मिळणे आवश्यक होते. हा सर्व प्रकार पारखी यांनी सांगितला. रिक्षाचा पुरेसा क्रमांकही नसल्यामुळे लॅपटॉप शोधणे हे तसे आव्हानाचेच काम होते. परंतू त्या परिस्थितीतही त्यांनी पारखी यांना धीर देऊन लॅपटॉप मिळवून देण्याबाबत दिलासा दिला. अनुभव आणि बुद्धिकौशल्य वापरून त्यांनी केवळ दीड तासात त्या रिक्षा चालकाचा शोध घेतला. नंतर त्याच्याकडे सर्व चौकशी करुन त्यांचा लॅपटॉपही त्याच्याकडून परत मिळवून दिला. या रिक्षामध्ये सीटच्या मागच्या बाजूला लॅपटॉप तशाच अवस्थेत होता. तो रिक्षा चालकाच्याही लक्षात आला नव्हता. लॅपटॉप परत मिळाल्याच्या आणि जाधव यांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्षतेच्या या सुखद अनुभवाबद्दल श्रद्धा पारखी यांनी सर्व वाहतूक पोलिसांचे आभार मानले. ही माहिती मिळताच ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी जमादार जाधव यांचा शनिवारी सत्कार करीत त्यांचे कौतुक केले. अशी कर्तव्यतत्परता दाखविलेल्या जाधव यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :thaneठाणेMissingबेपत्ता होणंtraffic policeवाहतूक पोलीस