शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे शाळांचा १८ कोटींचा निधी परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2020 01:44 IST

आदिवासी व दुर्गम भागातील शाळांचे बांधकाम व काही शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले होते.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्हा परिषदेवर प्रशासक असतानाच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील शाळांचे बांधकाम व काही शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांच्या मनमानी व निष्काळजीमुळे हा निधी खर्च झाला नाही. यामुळे तो निधी शासनाकडे जमा झाल्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांच्या निदर्शनास आले. याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.शेतकरी, गोरगरीब आणि आदिवासी समाजाची मुले, मुली शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या १८ कोटी ३५ लाख रुपयांमध्ये चकाचक झाल्या असत्या. परंतु, जिल्हा परिषदेवरील तत्कालीन प्रशासकांनी या शाळांच्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा निधी खर्च होऊ शकला नाही. परिणामी, हा निधी अखेर शासनजमा झाला आहे. याची माहिती सध्याच्या लोकप्रतिनिधींना लागताच त्यांनी संताप व्यक्त केला. शासनाकडे जमा झालेला हा निधी पुन्हा मिळवता येईल का, यासाठी काही सदस्यांचे प्रयत्न सुरू आहेत.ग्रामीण, दुर्गम भागांतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या १३२ वर्गखोल्या बांधण्यासाठी १२ कोटी ८५ लाख ६८ हजार रुपये मंजूर झाले होते. या रकमेतून १३२ खोल्या नव्याने बांधण्याची संधी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागास प्राप्त झाली होती. शाळेच्या या एका वर्गखोलीसाठी नऊ लाख ७४ हजार रुपये याप्रमाणे १२ कोटी ८५ लाख ६८ हजार रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला होता. या रकमेतून १३२ वर्गखोल्या बांधण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पार पाडणे अपेक्षित होते. मात्र, ते शक्य झाले नसल्याचे सांगितले. याप्रमाणेच ४० जुन्या वर्गखोल्यांची दुरुस्ती व डागडुजी करण्याचे काम मंजूर झाले होते. यासाठी पाच कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले होते.उपाध्यक्षांचा दुजोराअधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे शासनाकडे जमा झालेला १८ कोटी ३५ लाख ६८ हजार रुपयांचा निधी परत मिळवण्यासाठी काही सदस्य आगामी अर्थसंकल्पापूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रयत्न करणार आहेत. पण, मंजूर झालेला निधी खर्च करण्याची जबाबदारी त्याच आर्थिक वर्षात पूर्ण न केल्यास तो निधी आपसूक शासनजमा होतो. त्याप्रमाणे हा निधी शासनास जमा झालेला आहे. तो मिळवणे कठीण आहे. या निधीप्रमाणेच गेल्या वर्षाचा जनसुविधेचा निधी शासनजमा झाला असल्याचे जिपचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा