शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

पालिकेमुळेच टीडीआर घोटाळा , शेतकऱ्यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:18 IST

माजी सैनिक व शेतकरी कुटुंबांची सातबारा आदींवर नोंद असतानाही त्यांना डावलून मीरा- भार्इंदर महापालिकेने परस्पर बिल्डरला टीडीआर दिला.

मीरा रोड - माजी सैनिक व शेतकरी कुटुंबांची सातबारा आदींवर नोंद असतानाही त्यांना डावलून मीरा- भार्इंदर महापालिकेने परस्पर बिल्डरला टीडीआर दिला. वर्षभर शेतकरी कुटुंब पालिकेपासून थेट मंत्रालयापर्यंत चपला झिजवनूही महापालिका मात्र शेतकºयांचा हक्क न देता या टीडीआर घोटाळ्याला पाठीशी घालण्याचे काम करत आहे असा आरोप शेतकºयांनी केला. तर महसूल विभागानेही न्याय देण्याऐवजी न्यायालयात जाण्याचा सल्ला देत हात झटकले आहेत.भार्इंदर पूर्वेच्या नवघर गावातील जमीन वामन पाटील यांच्या नावे होती. त्यांच्या निधनानंतर ही जमीन त्यांचे वारस जनार्दन पाटील व अन्य ११ जणांच्या नावावर १९८७ मध्ये महसूली फेरफारने झाली. एकूण १२ वारस असताना मीरा भार्इंदर महापालिकेने मात्र सातबारा नोंदीतील केवळ पाटील यांनाच गृहित धरून राकेश अग्रवाल यांच्या डिंपल कंस्ट्रक्शनला परस्पर विकास आराखड्यातील रस्त्यासाठी टीडीआर दिला. आपल्या जागेच्या सातबारा नोंदी मीरा भार्इंदर महापालिकेच्या नावे आल्याचे कळताच माजी सैनिक चितरंजन पाटील व अन्य शेतकºयांनी गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये महापालिकेबरोबरच संबंधितांकडे तक्रार केली.शेतकरयांच्या तक्रारीवर तत्कालिन नगररचनाकार दिलीप घेवारे यांनी त्वरीत डिंपल कंस्ट्रक्शनला पत्र पाठवून १५ दिवसात खुलासा द्या अन्यथा कार्यवाही करू असे कळवले. परंतु त्यानंतर मात्र आजतागायत विद्यमान नगररचनाकार श्रीकांत देशमुख व संबंधित अधिकाºयांनी कार्यवाहीच केलेली नाही. शेतकरी कुटुंबीयांनी पालिकेकडे सातत्याने तक्रारी केल्या. आयुक्तांपासून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रारी केल्या. परंतु कार्यवाही झालेली नाही. उपविभागीय अधिकाºयांनाही तक्रारीवर दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागावी असा सल्ला दिला.अधिकारी बैठकीत व्यस्तसात-बारा नोंदी तसेच फेरफार आदीवर जनार्दन पाटील व अन्य अशी स्पष्ट नोंद असतानाही डोळेझाक केली गेली. महापालिका अधिकारी, डिंपल कन्स्ट्रक्शन यांनी संगनमताने भूमिपुत्र शेतकºयांचा हक्क डावलून हा टीडीआर घोटाळा केला, असा आरोप सुहास पाटील यांनी केला.तर या प्रकरणी आयुक्त बालाजी खतगावकर यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही. सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकnewsबातम्या