शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या आंदोलनामुळे रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 18:11 IST

अंबरनाथहून सुटणा-या लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीचे प्रवासी आधीच बसून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही.

अंबरनाथ : अंबरनाथहून सुटणा-या लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीचे प्रवासी आधीच बसून येत असल्याने अंबरनाथच्या प्रवाशांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. या प्रकरणी मनसेने आज रेल्वे स्थानकात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेच्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ज्या प्रमाणात ठेवण्यात आला होता हे पाहिल्यावर अंबरनाथ स्थानकाला पोलीस छावणीचे स्वरूप आल्याचे दिसत होते. मनसेच्या कार्यकर्त्यांना लोकलमध्ये चढू न देता हे आंदोलन संपविण्याचा पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला. 

अंबरनाथ स्थानकातून सुटणा-या लोकलमध्ये उल्हासनगर आणि विठ्ठलवाडीतील प्रवासी आधीच बसून येत असल्याने अंबरनाथ स्थानकातील प्रवाशांना बसण्यासाठी जागाच शिल्लक राहत नाही. या प्रकरणी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, जिल्हा संघटक संदीप लकडे, शहर शंघटक स्वप्नील बागुल, नगरसेविका अपर्णा भोईर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे प्रशासनाला लेखी निवेदन देत ही समस्या सोडविण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीनंतरही रेल्वे प्रशासनाने या प्रवाशांवर कारवाई न केल्याने मनसेने बुधवारी सकाळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. हे आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश काढत आंदोलनकर्त्यांना नोटीस बजावली होती.मात्र या नोटिसीलाही न जुमानता भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज रेल्वे स्थानकात आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र मनसेच्या आंदोलनामुळे स्टेशन परिसरात वातावरण बिघडण्याची शक्यता असल्याने रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षारक्षकांनी संपूर्ण रेल्वे स्थानकात कडक बंदोबस्त ठेवला होता. मनसे कार्यकर्त्यांकडून काही चुकीचे घडणार नाही यासाठी साध्या वेशात देखील पोलीस तैनात करण्यात आले होते. अंबरनाथ स्थानकात मनसे कार्यकर्ते दाखल होताच त्यांना आवारण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र आंदोलकांनी पोलिसांना न जुमानता स्थानकात प्रवेश केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांच्या मागे राहत ते लोकलमध्ये जाणार नाहीत याची दक्षता घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकात घोषणाबाजी करीत वातावरण तंग केले होते. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे लोकलमध्ये चढण्याची संधीच त्यांना मिळाली नाही. अखेर जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

दरम्यान आजच्या आंदोलनामुळे मनसेचा चांगलाच धडका हा उलट प्रवास करणा-या आणि जागा अडविणा-या प्रवाशांनी घेतला होता. आंदोलनाच्या भितीमुळे एकही प्रवासी उलट दिशने लोकलमध्ये चढला नाही. तसेच प्रत्येक गाडीत पोलीसांचा बंदोबस्त असल्याने आंदोलनांनाही लोकलमध्ये चढता आले नाही. 

टॅग्स :ambernathअंबरनाथMNSमनसे