शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेमुळे भिवंडीत रहिवाशांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:36 AM

महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

भिवंडी : महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे नियोजन नसल्याने शहरातील अनेक भागांमध्ये रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरात काही ठिकाणी चोवीस तास, तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे.महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी पालिका स्टेमकडून ७३ एमएलडी, मुंबई महानगरपालिकेकडून ४० एमएलडी पाणी विकत घेते, तर २ एमएलडी पाणी पुरवठा वºहाळा तलावातून केला जात आहे. अशा प्रकारे शहरासाठी ११५ एमएलडी पाणी पुरवठा होत असून, त्याचे नियोजन नसल्याने शहरातील पाणी वितरणात असमानता दिसून येते. सर्वांना नियमीत व वेळेत पाणी मिळावे यासाठी १४ टाक्या बांधण्यात आल्या आहेत. त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात आल्या असून, एक टाकी येत्या महिन्यात सुरू होणार आहे.महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाºया स्टेम व मुंबई महानगरपलिकेने प्रत्येक आठवड्यास २० टक्के पाणी कपात केली आहे. त्यामुळे बुधवारी आणि गुरूवारी चोवीस तास पाणी बंद असते. त्यानंतर आलेले पाणी जलवाहिनीत भरण्यासाठी १० तास लागतात. त्यामुळे नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे जलवाहिनीचे शेवटचे टोक असलेल्या भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही. अशा वेळी मागणीप्रमाणे अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे दरम्यानच्या काळात पाणी पुरवठा कमी दाबाने, अथवा पाणी न आल्याने अंबीकानगर, ब्राम्हणआळी, अशोकनगर, अंजूरफाटारोड, निजामपूर, देवजीनगर, भंडारी कंपाऊंड, टावरे कंपाऊंड, विठ्ठलनगर भागात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यापैकी ३ ठिकाणी दररोज टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मनपाच्या पाणी पुरवठ्याच्या वेळा काही भागात ठरवून दिल्या आहेत. काही ठिकाणी चोवीस तास पाणी पुरविले जात आहे. शहरातील अनेक लोकवस्तींमध्ये रात्रीच्या वेळी पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, सर्वांना सकाळी ६ ते रात्री १० वाजताच्या दरम्यान पाणी पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे.शहरातील पाणी पुरवठा करण्यासाठी १४ टाक्या बांधलेल्या असून, त्यापैकी केवळ ६ टाक्या सुरू करण्यात यश आले आहे. स्टेम आणि मुंबई मनपाकडून मुबलक पाणी मिळत आहे. हे पाणी सर्व टाक्यांतून रहिवाशांना देण्याची व्यवस्था झाल्यास, शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा केल्याने होणारी पाणी टंचाई दूर होणार आहे.- संदिप पटनावर,उप अभियंता, पाणी पुरवठा विभाग, भिवंडी महानगरपालिका

टॅग्स :Waterपाणी