शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे प्रवासी तरुणीचा साखरपुडा झाला आनंदात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 20:30 IST

मीरा रोड - साखरपुड्यासाठी बोरिवलीवरून भार्इंदरला उतरल्यानंतर नवरी मुलगी व तिचे मामा हे रिक्षात नवरी मुलीचे कपडे, रोख, दागिने व नव-या मुलास देण्यासाठीच्या भेटवस्तू आदी ठेवलेली बॅग काढण्यास विसरल्याने सर्व हवालदिल झाले होते

मीरा रोड - साखरपुड्यासाठी बोरिवलीवरून भार्इंदरला उतरल्यानंतर नवरी मुलगी व तिचे मामा हे रिक्षात नवरी मुलीचे कपडे, रोख, दागिने व नव-या मुलास देण्यासाठीच्या भेटवस्तू आदी ठेवलेली बॅग काढण्यास विसरल्याने सर्व हवालदिल झाले होते. भार्इंदर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान प्रवासी बॅग विसरून गेल्याचे समजताच रिक्षा चालकाने बॅग परत आणून दिल्याने वधूसह नातलगांनी त्याचे आभार मानत साखरपुडा पार पाडला.बोरिवलीच्या काजुपाडा भागात राहणा-या पूनम ठाकूर यांची मुलगी मेघना हिचा साखरपुडा आज गुरुवारी भार्इंदर पश्चिमेस उड्डणपुलाखालील एका हॉटेलमध्ये होता. मेघना ही मैत्रीण रिया व मामा मुकेश दवे यांच्यासह दुपारी काजुपाडा येथून रिक्षा पकडून भार्इंदर येथे आली. घाईगडबडीत रिक्षातून उतरताना मागे ठेवलेली बॅग काढण्यास विसरले. मेघना हिचे साखरपुड्यात घालण्यासाठीचे कपडे, सोन्याची चैन व अन्य दागिने, नव-या मुलाला देण्यासाठीच्या भेट वस्तू - मिठाई तसेच जेवण आदीसाठीच्या खर्चाकरिता म्हणून सुमारे २५ हजार रोख व मोबाईल बॅगेत होता. बॅग विसरल्याचे लक्षात येताच मेघना, तिची आई, भाऊ व अन्य नातलग साखरपुडा कसा होणार या चिंतेने हवालदिल झाले.काहींनी भार्इंदर पोलीस ठाणे गाठले. पण रिक्षाचा नंबर वगैरे काहीच माहिती नव्हते. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी बॅगेत असलेल्या मोबाईलवर फोन केला. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने लागलीच मोबाईलच्या आधारे त्याचे लोकेशन शोधण्यास घेतले. अन्य पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी देखील रिक्षाचा शोध घेण्यास धापवळ सुरू केली.मागे मोबाईल वाजत असल्याचे रिक्षाचालक अहमद सत्तार सय्यद (४६) रा. पाटील कंपाऊंड, काजुपाडा याला लक्षात आले. त्याने मागे पाहिले तर रिक्षात भार्इंदरला उतरलेले प्रवासी बॅग विसरून गेल्याचे समजले. त्याने रिक्षा वळवून मेघना हिला उड्डाणपुलाखालील ज्या हॉटेलजवळ सोडले होते तेथे आला व बॅग त्याने जशीच्या तशी परत केली. बॅग हरवल्याने सुमारे पाऊण तास मेघना व तिचे नातलग चिंतेत होते. पण बॅग परत घेऊन आलेल्या रिक्षाचालक अहमद याला पाहुन सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अहमद अगदी देवासारखा आमच्यासाठी धाऊन आला. नाही तर साखरपुडा कसा होणार या विवंचनेत आम्ही होतो, असे मेघनाची आई पूनम म्हणाल्या. पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी देखील अहमद याच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याचे कौतुक करत आभार मानले.

टॅग्स :mira roadमीरा रोड