शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सदोष दोषारोपमुळे जिल्ह्यातील गर्भलिंग तपासणीतील आरोपी मोकाट! आढावा बैठकीत झाले उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 20:41 IST

गर्भधारणेच्या कालावधीत विविध तपासण्यांण्यासह मनमानीपणे गर्भलिंग तपासणीदेखील झाल्या असून, जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयात सुमारे ४८ केसेस दाखल आहेत. मात्र सदोष दोषारोपपत्रामुळे...

 - सुरेश लोखंडे ठाणे - गर्भधारणेच्या कालावधीत विविध तपासण्यांण्यासह मनमानीपणे गर्भलिंग तपासणीदेखील झाल्या असून, जिल्हा सत्र न्यायालयासह उच्च न्यायालयात सुमारे ४८ केसेस दाखल आहेत. मात्र सदोष दोषारोपपत्रामुळे कोणावरही कडक कारवाई झालेली नाही, तक्रारी होऊनही आरोपी मोकाट असल्याची गंभीर बाब जिल्हाधिका-यांच्या आढावा बैठकीत उघड झाली आहे.गर्भलिंग तपासणी करणे कायद्याने गुन्हा असूनही काही ठिकाणी या तपासण्या झाल्याच्या तक्रारीनुसार गुन्हेही दाखल आहेत. मात्र सदोष दोषारोपपत्र दाखल होत असल्यामुळे १० टक्के आरोपदेखील सिद्ध होऊ शकले नसल्याची बाब जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांनी व्यक्त करून तपास यंत्रणेवर ताशेरे ओढले.जिल्ह्यात आतापर्यंत गर्भलिंग तपासणीविरोधात दाखल झालेल्या तक्रारी, न्यायालयात दाखल केसेस, निर्दोष सुटलेल्या आरोपींची कारणमिमांसा, तपास यंत्रणांची कारवाई अहवाल आदी माहिती पुढील आढावा बैठकीत सादर करण्याचे आदेश भीमनवार यांनी आरोग्य यंत्रणेला दिले आहेत. यामुळे आरोग्य विभाग युद्धपातळीवर कामाला लागले आहे.ठाणे महापालिका क्षेत्रासह केडीएमसी, उल्हासनगर, मीराभार्इंदर, नवी मुंबई, भिवंडी या महापालिकांच्या कार्यक्षेत्रांसह ठाणे ग्रामीणमध्ये ९८७ सोनोग्राफी सेंटर असल्याची नोंद आहे. मात्र त्यातील ५७३ सेंटर सुरू आहेत. याशिवाय टूडीइको, आयव्हीएफ, सीटीस्कॅन, एमआरआय आदी १३० सेंटर असून, ३६ सेंटर इनअ‍ॅक्टीव आहेत. ३५० सेंटर कायमचे बंद असल्याचे आढळून येत आहेत. यातील ठिकठिकाणी झालेल्या मनमानीनुसार ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात या आधी ११ केसेस दाखल झालेल्या आहेत. त्यापैकी सिव्हील सर्जनच्या कार्यक्षेत्रातील तीन केसेस न्याय प्रविष्ठ आहेत. नवी मुुंबईच्या सातपैकी एक केस निकाली काढली असून, उर्वरित सहा न्यायप्रविष्ठ आहेत. ठाणे मनपा क्षेत्रातील एका केसेसचा निकाल लागलेला असून, तोही विरोधात गेला आहे.मुंबई उच्च न्यायालयातदेखील ३० केसेस दाखल आहेत. यापैकी नवीमुंबईच्या २२ केसेमधील १२ केसेस निकाली काढण्यात आल्या असून, सात केसेस न्यायप्रविष्ठ आहेत. उर्वरित तीन केसेस मागे घेण्यात आल्या असल्याचे अहवालावरून उघड होत आहे. मीराभार्इंदरच्या सात केसेसमध्ये पाच पेंडिंग आहेत. केडीएमसीमधील एक केस पेंडिंग आहे. या व्यतिरिक्त ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रातून टोल फ्री क्रमांकावर चार तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. ‘आमची मुलगी’ संकेतस्थळावरील दोन तक्रारींची चौकशी केडीएमसीकडूनही झालेली नसल्याचा अहवाल या आढावा बैठकीत समोर आला. यामुळे गर्भलिंग तपासणींच्या तक्रारींवरील कारवाईत हलगर्जी , निष्काळपणा दिसून येत असल्यामुळे संपूर्ण तक्रारींवरील कारवाईचा कारणमिमांसा अहवाल भीमनवार यांनी मागवलेला आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा