शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आचारसंहितेमुळे ठाणे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार शिक्षकांची बदली प्रक्रिया स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 02:19 IST

लोकमत इफेक्ट : कोकण विभागीय आयुक्तांचे आदेश, कार्यमुक्त न करण्याच्या सूचना

सुरेश लोखंडेठाणे : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. तत्पूर्वी, ठाणे जिल्ह्यातील दोन हजार शिक्षक व कोकणातील जिल्ह्यांमधील शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. या शिक्षकांना २ मे नंतर आपापल्या नवीन शाळांवर हजर होण्याचे आदेशही मिळाले होते; मात्र आचारसंहिता संपेपर्यंत आता या शिक्षकांना नवीन शाळेवर हजर होता येणार नसल्याचे आदेश कोकण विभागीय आयुक्तांनी जारी केले आहे. यात ठाणे जिल्ह्यातील दोन हजार शिक्षकांचा समावेश आहे.

‘राज्यातील शिक्षकांच्या बदल्या स्थगित; ठाण्यासह कोकणातील शिक्षक बदल्या जैसे थे’ या मथळ्याखाली २४ मार्च रोजी लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून या विषयावर प्रकाशझोत टाकला होता. या वृत्ताची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी अणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बदली झालेल्या शिक्षकांना आचारसंहिता संपेपर्यंत कार्यमुक्त करू नये, असे आदेश ३० मार्च रोजी जारी केले. त्यामुळे नवीन शाळेवर २ मे पासून शिक्षक हजर होणार होते; पण आता आयुक्तांच्या आदेशामुळे ते रखडले आहे.

कोकणातील जिल्हा परिषदांचे शिक्षक वगळता राज्यभरातील जिल्हा परिषदांच्या शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया आचारसंहितेमुळे तात्पुरती थांबवण्याचे आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कक्ष अधिकारी सं.ना. भंडारकर यांनी २२ मार्च रोजी जारी केले होते. त्यातून कोकणातील शिक्षकांना मात्र वगळले होते.  ठाण्यासह कोकणातील शिक्षकांची आॅनलाइन बदली प्रक्रिया मागील सुमारे एक वर्षापासून रखडली होती. ती आचारसंहितेपूर्वी पूर्ण झाली. त्यात ठाणे जिल्हा परिषदेच्या दोन हजार ११९ प्राथमिक शिक्षकांचा समावेश होता.बदली झालेल्या शिक्षकांना नवीन शाळेवर हजर होण्याचे आदेशही जारी झाले होते. त्यानुसार, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी या शिक्षकांना हजर व्हावे लागणार होते. म्हणजे, १ मेचा महाराष्टÑ दिवस साजरा करून २ मेपासून त्यांना नवीन शाळांवर हजर होण्याचे आदेश होते; पण आता नव्या आदेशानुसार आचारसंहिता संपल्यानंतर, म्हणजे कदाचित २३ मेनंतर या शिक्षकांना त्यांच्या नवीन शाळेवर हजर व्हावे लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

टॅग्स :Teacherशिक्षकElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग