शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

धुळीत गुदमरला शेणवे - किन्हवली रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:43 PM

वाहनचालक, नागरिक झाले त्रस्त; ऍन्यूटी हायब्रीडच्या रस्त्यांना गती देण्याची मागणी

किन्हवली : मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या ऍन्युटी हायब्रीड योजनेचे काम अत्यंत मंद गतीने सुरू असल्याने या योजनेअंतर्गत समाविष्ट रस्त्यांची फारच दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण झालेली असताना आता धुळीमुळे मुख्य ग्रामीण रस्ता असलेला शेणवे - किन्हवली रस्ता धुरळ्यात गुदमरल्याचे दिसते. त्यामुळे वर्दळीच्या ग्रामीण रस्त्यांच्या कामांची गती वाढवून वाहतूकदारांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.शेणवे - किन्हवली - सरळगाव - देहरी प्र.जि.मा.क्र. ६४ हा रस्ता महत्त्वाकांक्षी एॅन्युटी हायब्रीड या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावरील ३० किमी अंतराचे रुंदीकरण, डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूंनी प्रत्येकी ६ मीटर रूंद होणार आहे. या मार्गावर शहापूर तालुक्यात शेणवे, मळेगाव, बेडीसगाव, उंभरई, किन्हवली या ठिकाणी पिकअप शेड बांधणे, काँक्रिटीकरण करणे याही कामांचा समावेश असून यासाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.या कामाला उशीरा सुरुवात करण्यात आली असून खड्डे बुजवण्याचे कामही संथगतीने केले जात आहे. काही ठिकाणी रस्त्यावरच खडीचे ढिगारे टाकण्यात आल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे. काम सुरू असतानाही या मार्गावर सध्या वाहतूक सुरू आहे. त्यामुळे धुळीचे लोट उठत असल्याचे चित्र आहे. परिणामी, खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त वाहनचालक आणि नागरिकांना धुळीमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागला आहे. बऱ्याच दिवसांपासून सर्दी, खोकला, दमा, फुफ्फुसाच्या आणि श्वसनाच्या आजारांनी हैराण रु ग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती खाजगी डॉक्टरांकडून मिळाली. दरम्यान, शहापूरचे आ. पांडुरंग बरोरा यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणात या रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. तरीही परिस्थिती तशीच आहे.एॅन्युटी हायब्रीड योजनेची वर्कआॅर्डर अद्यापही झालेली नसून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे जानेवारीला एॅन्युटीचे काम सुरू होईल.- रामचंद्र डोंगरे,शाखा अभियंता, किन्हवली

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकthaneठाणे