शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

खड्डे बुजविण्याचा प्रतिसाद कालावधी झाला कमी, तत्काळ खड्डे बुजविण्याची पालिकेची हमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 5:08 PM

रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजविण्यासाठी आता ठाणे महापालिकेने प्रतीसाद कालावधी कमी केला आहे. त्यामुळे ठाणेकरांनी एखाद्या खड्याची तक्रार केली तर अवघ्या दोन तासाच्याच आता खड्डा बुजविण्यात येऊन तेथून वाहतुकसुध्दा सुरु होईल असा दावा पालिकेने केला आहे.

ठळक मुद्देखड्डे बुजविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापरपाच ते सहा दिवसात खड्डे बुजविण्याची मोहीम होणार पूर्ण

ठाणे - रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर आता पालिकेने आणखी एक फंडा पुढे आणला आहे. रस्त्यावरील खड्डा दाखवा तो आम्ही दोन तासात बुजवू असा दावा पालिकेने केला आहे. खड्डे बुजविण्याचा प्रतिसाद कालावधी कमी केला असून तत्काळ खडड्डे बुजविण्याची हमी दिली आहे. तसेच पालिकेने स्टारग्रेड अ‍ॅपच्या माध्यमातून आलेल्या खड्यांच्या तक्रारींवरसुध्दा तत्काळ उपाय योजना करण्याचा दावा केला आहे.                            ठाणे महापालिका हद्दीत मागील काही दिवसापासून रस्त्यांवर पडलेल्या खड्यांचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. यातील काही तंत्रज्ञान यशस्वी झाले तर काही तंत्रज्ञान अक्षरश: फेल झाले आहेत. परंतु पावसाने उसंत घेतल्यानंतर पालिकेने शहरातील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत ७५ टक्के खड्डे बुजविण्यात आले आहेत. तसेच उर्वरीत खड्डे पाच ते सहा दिवसात बुजविण्यात येतील असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. आतापर्यंत पालिकेने ब्रीजवरील खड्डे बुजविण्यासाठी अक्वा पॅच या तंज्ञत्रानाचा वापर केला असून त्यानुसार ८.१८ स्केअर मीटरचे खड्डे या तंत्रज्ञानापासून बुजविण्यात आले आहेत. यासाठी ६४ हजार ८०० रुपयांचा खर्च झालेला आहे. तर इस्मॅक पीआर या पॉलीमर तंत्रज्ञानाचा वापर सुध्दा खड्डे बुजविण्यासाठी झाला असून त्यानुसार या तंत्रज्ञानानुसार १११.३६ स्केअर मीटरचे खड्डे बुजविण्यात आले आहेत. यासाठी १ लाख ६० हजार ८३८ रुपयांचा खर्च झालेला आहे. एम सीक्स्टी ग्रेडच्या तंत्रज्ञानात ३९०० स्केअर मीटरचे खड्डे बुजविण्यात आले असून यासाठी ४२ लाख ३८ हजार १३० रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. तर रेन पॉलीमर या तंत्रज्ञानात ९०९.९ स्केअर मीटरचे खड्डे बुजविण्यात आले असून यासाठी १५ लाख ९३ हजारांचा खर्च करण्यात आला आहे.स्टार ग्रेडवरील तक्रारीसुध्दा तत्काळ सोडविणारआता तत्काळ खड्डे बुजविण्यासाठीचा प्रतिसाद कालावधी कमी करण्यात आला असून खड्याची तक्रार करा, पुढील दोन तासांच्या आत खड्डा बुजविला जाईल अशी हमी पालिकेने दिली आहे. तसेच स्टार ग्रेड अ‍ॅपवर सुध्दा खड्यांच्या तक्रारी आल्यास त्याचे निरासरण तत्काळ केले जाणार आहे. त्यातही यापूर्वी या अ‍ॅपवर नागरीकांना केवळ तक्रारीच करता येत होत्या. परंतु आता नागरीकांना केलेल्या तक्रारींवर काय कारवाई झाली, खड्डा बुजविण्यात आला अथवा नाही, याची माहिती त्याच्या मोबाईलवर दिली जाणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त