शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

'पबजी'सारख्या गेम्सच्या व्यसनामुळे बालगुन्हेगारांची संख्या झपाट्याने वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 04:10 IST

मोबाइलमधील हिंसक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या गेम्समुळे मुलांमध्ये कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉलसारखे मैदानी खेळ किंवा बुद्धीचा कस लागणाºया बुद्धिबळासारख्या खेळाची आवड कमी होत आहे.

- जितेंद्र कालेकर

मोबाइलमधील पबजीसारख्या गेम्सच्या आहारी गेलेल्या मुलांबाबतच नव्हे तर एकूणच समाजातील वेगवेगळ्या घटकांमधील मुलांमधील वाढती हिंसा, गुन्हेगारी प्रवृत्ती, छोट्या कारणास्तव हाणामारीवर उतरणे, या बाबी पोलिसांकरिता डोकेदुखी ठरत आहेत. बालगुन्हेगार गुंतलेल्या अनेक प्रकरणांत पोलीस प्रकार किरकोळ असेल तर थेट गुन्हा दाखल करत नाहीत. पालकांना बोलावून मुलामुलींचे समुपदेशन करतात. कारण, एकदा का त्या मुलांवर गुन्हेगारीचा शिक्का बसला, तर कदाचित भविष्यात तो गुन्हेगारी मार्गाकडेच आकर्षित होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मुलांशी संबंधित नोंदलेल्या गुन्ह्यांचे प्रमाण तुलनेने कमी दिसले, तरी प्रत्यक्षात मुलांशी संबंधित गुन्हे वाढले आहेत.

मोबाइलमधील हिंसक वृत्तीला खतपाणी घालणाऱ्या गेम्समुळे मुलांमध्ये कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉलसारखे मैदानी खेळ किंवा बुद्धीचा कस लागणाºया बुद्धिबळासारख्या खेळाची आवड कमी होत आहे. मोबाइलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये हिंसक वृत्ती वाढीस लागल्याचे डोंबिवलीतील खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. लहान मुले असमंजस असल्याने मोबाइल विश्वातील हिंसकतेला बळी पडतात. मात्र, कल्याणच्या कोळसेवाडी भागातील एका २७ वर्षीय तरुणाने मोबाइलवर गेम खेळल्याचा जाब विचारणाºया त्याच्या भावी मेहुण्यावरच चाकूने हल्ला केल्याची घटना ताजी आहे.उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय तसेच कनिष्ठ मध्यमवर्गीय अशा सर्वच स्तरांमधील घरांमधील मुले ही थोड्याफार प्रमाणात हिंसेच्या आहारी गेल्याचे पोलिसांना आढळते. उच्चभ्रू वस्तीमधील आईवडिलांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मध्यमवर्गीयांची अवस्था तीच आहे, तर कनिष्ठ मध्यमवर्गीयांमध्ये मोलमजुरी, नाकाकामगार किंवा झोपडपट्टीमध्ये राहणाºयांच्या मुलांमध्येही अशीच प्रवृत्ती आढळून येत असल्याचे पोलीस अधिकारी सांगतात. वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी सांगितले की, झोपडपट्टी परिसरातील अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती आढळते. वागळे इस्टेट, इंदिरानगर, आनंदनगर येथील झोपडपट्टीतील १४ ते १८ वयोगटांतील काही मुले व्यसनाधीन आहेत. त्यामुळे त्यांच्यात हिंसक वृत्ती आढळते. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधव म्हणाले की, ज्या पालकांना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यांच्यावर योग्य संस्कार होत नाहीत. अशी १२ ते २० वयोगटांतील मुले दारू, व्हाइटनर आणि ई-सिगारेटसारख्या व्यसनाच्या अधीन गेल्याचे आढळतात. अशाच व्यसनांसाठी ते चोरीचाही मार्ग पत्करतात. बºयाचदा हीच मुले हाणामारी करतात. गेल्या सहा महिन्यांमध्ये चोरीच्या प्रकरणात सात ते आठ अल्पवयीन मुलांना पकडल्याचेही जाधव यांनी सांगितले. श्रीमंत घरांमधील मुले रस्त्यात मोटार चालवताना कुणी आडवा आला, मॉल किंवा हॉटेलमध्ये वाद झाला, तर लागलीच हिंसाचारावर उतरतात, असे पोलिसांचे म्हणणे आहे.कासारवडवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी म्हणाले, पबजीसारख्या मोबाइलमधील खेळाच्या आहारी गेलेली मुले सतत हाणामारीचाच विचार करतात. त्यामुळे त्यांच्याकडून मोबाइल हिसकावून घेणाºया पालकांवरही ते धावून जातात. पबजी या खेळाच्या प्रकारामध्ये एक ते चार स्टेप्स आहेत. या प्रत्येक स्टेप्स अडथळ्यांमधून आल्यानंतर खेळातील सैनिकाला मारून तो पुढे जात असल्याने त्याच्यातील हिंसाही वाढीस लागते. तो रागीटही बनतो. अगदी क्षुल्लक कारणावरून मुलांमध्ये हाणामारी झाल्याचे शिक्षक सांगतात. एखाद्या मुलीशी तू का बोलला किंवा मला चॉकलेट का दिले नाही, अशा अगदीच लहान बाबींसाठीही एकमेकांची कॉलर धरण्यापर्यंत या मुलांची मजल जाते. सहनशील वृत्ती कमी होत असल्यामुळे एकमेकांची छेड काढणे, हाणामाºया अशा प्रकारांमध्येही पूर्वीपेक्षा वाढ झाल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून येत असतात. काही मुले ही तरुण वयात बॉडी बनवण्याकरिता जिम जॉइन करतात आणि अवघ्या सहा महिने ते वर्षभरात इतर मुलांवर टर्रेबाजी करत फिरतात.

अशा मुलांना समज देऊन समुपदेशन करण्यात येत असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी ठाण्याच्या वागळे इस्टेट येथील एका १९ वर्षीय कबड्डीपटूनेही मोबाइलच्या हव्यासापोटी एका महिलेचा मोबाइल जबरीने हिसकावला होता, तर नौपाड्यामध्ये एका अल्पवयीन मुलाने पूर्ववैमनस्यातून दोन महिन्यांपूर्वी रिक्षाला आग लावली होती. वागळे इस्टेट परिसरातील किसननगर भागातील एका १७ वर्षीय मुलाने, तर त्याच्याच १५ वर्षीय बहिणीवर लैंगिक अत्याचार केला होता. वागळे इस्टेट भागात चार महिन्यांपूर्वी दोन गटांतील हाणामारीमध्ये १४ ते १८ वर्षीय मुलांनी एकमेकांवर ब्लेडने वार केल्याचाही प्रकार घडला होता. अगदी अलीकडेच ‘इसिस’ या संघटनेच्या संशयित पाच जणांना कौसा भागात राज्य दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली. यामध्ये एका १६ वर्षीय मुलाचाही समावेश आहे.परदेशातील इसिस हॅण्डलरच्या संपर्कात असलेला ठाण्याच्या कौसा भागातील ताहीर या मुलाशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होता. त्यामुळे मोबाइलवरील गेम्स, ब्ल्यू फिल्म, धार्मिक उन्माद वाढवणारे व्हिडीओ हे तरुण पिढीची माथी भडकावत आहेत. त्यांना हिंसाचार करण्यास, बलात्कार-विनयभंग करण्यास उद्युक्त करत आहेत. काही तरुण तर थेट दहशतवादी कारवायांकडे आकृष्ट होत आहेत. मोबाइलच्या आहारी गेलेल्या या तरुणाईला वेळेत योग्य ते संस्कार न मिळाल्यास येत्या काही वर्षांत बालगुन्हेगारांची संख्या वाढण्याची भीती ठाण्यातील एका पोलीस अधिकाºयाने व्यक्त केली आहे.ठाण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ संतोष कदम म्हणाले की, चार ते १२ वयोगटांतील मुलांकडे हल्ली सर्रास मोबाइल आढळतो. पबजीसारख्या मोबाइलमधील खेळामुळे विचार विध्वंसक होतात. पालकांनी मुलांच्या बुद्धीला चालना देणारे आणि शरीराला व्यायाम देणारे खेळ त्यांना खेळू दिले पाहिजे. मोबाइलने मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवरही विपरित परिणाम होत असल्याचे एका पाहणीत आढळून आले आहे, याचा विचार पालकांनी गांभीर्यपूर्वक करण्याची गरज आहे, असेही डॉ. कदम म्हणाले.डोंबिवलीतील एका नामांकित शाळेने मोबाइल गेम्सच्या आहारी गेलेल्या मुलांना त्यापासून परावृत्त करण्याकरिता पालकांचे समुपदेशन केले. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांतील बालगुन्हेगारांकडून घडलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला असता प्रत्यक्षात खूप गंभीर गुन्हा घडल्यावरच पोलीस गुन्हा दाखल करतात. अन्यथा, लहान मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, त्यांच्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का बसू नये, याकरिता समुपदेशन करून घरी पाठवतात. मात्र, वेळीच मोबाइलवरील गेम्स, ब्ल्यू फिल्म, धार्मिक विद्वेष पसरवणारे व्हिडीओ यापासून तरुण पिढीला परावृत्त केले नाही, तर बालगुन्हेगारी ही मोठी समस्या बनण्याची भीती अनेक पोलीस अधिकारी व्यक्त करतात. 

टॅग्स :Mobileमोबाइलthaneठाणे