शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

व्यसनाधीनतेमुळे इकबालवर कुख्यात डॉन दाऊदची नाराजी, पोलीस चौकशीत अनेक गुपिते उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2017 21:29 IST

इकबाल कासकर आणि कुख्यात डॉन दाऊद यांच्यात वारंवार बोलणे झाल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले.

ठाणे, दि. 21 : इकबाल कासकर आणि कुख्यात डॉन दाऊद यांच्यात वारंवार बोलणे झाल्याची माहिती पोलीस चौकशीत समोर आल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे खंडणी प्रकरणात दाऊदच्या सहभागाचीही पडताळणी करण्यात येत आहे. दरम्यान, ठाण्यातील काही नगरसेवक आणि नेत्यांचाही सहभाग समोर येत असल्याचा गौप्यस्फोट पोलीस आयुक्तांनी केल्याने ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेले असतानाच, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. मात्र, त्यांचे नाव अद्याप समोर आले नसल्याचे आयुक्तांनी त्यांना सांगितले.

कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी आपले काही वर्षांपूर्वी बोलणे झाले. सध्या आपण त्याच्या संपर्कात नसल्याचा दावा खंडणीप्रकरणी अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याने केला आहे. ठाणे-मुंबईतील आणखी कोणाकोणाकडे इकबालच्या अर्थात दाऊदच्या गँगने खंडणीची मागणी केली? ती कशाच्या स्वरूपात आहे? या टोळीमध्ये आणखी किती जण सक्रिय आहेत? यात स्थानिक पातळीवरील आणि दाऊदप्रमाणे परदेशातील आणखी कुणाचा समावेश आहे का? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती स्वत: पोलीस आयुक्त परमवीर सिंग, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे आणि खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्याकडून त्याच्यावर करण्यात येत आहे.

परंतु, अनेक प्रश्नांना तो नकारात्मक उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊद आणि इकबाल यांच्यात फोनद्वारे वारंवार संवाद झाल्याचा पोलिसांना संशय आहे. परंतु, व्हीओआयपी (व्हाइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) द्वारे हा संपर्क झाल्याची शक्यता असल्यामुळे बाहेरील कॉलही स्थानिक असल्याचे आढळून येते. त्यामुळे पुरावे मिळवताना पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या टोळीमध्ये मुंबई, ठाण्यातील अनेक जण सहभागी असल्याची माहिती पोलीस तपासात उघड होत आहे. इकबाल हा कोकेनपासून अनेक अमली पदार्थांच्या आहारी गेलेला आहे. याच कारणामुळे दाऊदची आपल्यावर नाराजी आहे. याच नाराजीमुळे दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलणे झाले नसल्याचा दावा त्याने पोलिसांकडे केला. आता त्यात कितपत तथ्य आहे, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.लवकरच चौघांना अटकदाऊद टोळीतील काही गुंडांची माहिती इकबालकडून तपास पथकाला मिळाली आहे. त्यामुळे मुंबई परिसरातून आणखी तीन ते चार जणांना लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असेही अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितले. इकबालसोबत ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी एकाचा खंडणी प्रकरणात बºयापैकी सहभाग आढळला आहे. त्याचीही अद्याप चौकशी सुरूच आहे. अन्य दोघांना गुन्हे अन्वेषण विभागाकडे चौकशीसाठी दररोज हजर राहण्यास बजावण्यात आले आहे.आव्हाडांनी घेतली आयुक्तांची भेट...इकबाल कासकरला खंडणीप्रकरणी अटक केल्यानंतर या प्रकरणात ठाण्यातील काही नगरसेवक आणि काही नेत्यांचा सहभाग समोर येत असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी जाहीर केले होते. काही वृत्तवाहिन्यांनी ठाण्यातील राष्टÑवादीच्या एका नेत्याचा तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्तीयांचा यात सहभाग असल्याचे वृत्त दिल्याने समाजमाध्यमांमध्येही उलटसुलट चर्चा सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी गुरुवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्या वेळी तुमचे यात कुणीही नाव घेतले नसल्याचा खुलासा आयुक्तांनी केला. इकबालच्या अटकेवर पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्यांच्या पथकाचे आव्हाड यांनी अभिनंदन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दाऊदने घर बदलले?सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या दाऊदने गेल्या काही वर्षांमध्ये तीन ते चार वेळा आपले राहण्याचे ठिकाण बदलल्याची माहिती इकबालकडून तपास पथकाला मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात, या वृत्ताला वरिष्ठ अधिकाºयांनी मात्र दुजोरा दिला नाही.