शहरं
Join us  
Trending Stories
1
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
2
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
3
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
4
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
5
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
6
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
7
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
8
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
9
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
10
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
11
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
12
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
13
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
14
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
16
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
17
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
18
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
19
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
20
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य

गुरांअभावी गोबर गॅस झाला दुर्मीळ

By admin | Updated: February 11, 2017 03:44 IST

ग्रामीण भागात घरगुती इंधनासाठी जंगलाची होणारी बेसुमार जंगलतोड थांबविण्यासाठी पर्याय म्हणून शासनाने गोबर गॅसला चालना दिली होती.

राहुल वाडेकर ,विक्रमगडग्रामीण भागात घरगुती इंधनासाठी जंगलाची होणारी बेसुमार जंगलतोड थांबविण्यासाठी पर्याय म्हणून शासनाने गोबर गॅसला चालना दिली होती. मात्र, ग्रामीण भागात गुरांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने गोबर गॅससाठी लागणारे शेण पाहिजे त्या त्याप्रमाणात उपलब्ध होत नाही. तर आधुनिक युगात कष्ट न करता गॅसचे सिलेंडर उपलब्ध होत असल्याने गोबर गॅसही दुर्मिळ होत चालले आहेत़ग्रामीण भागात लाकूड इंधनाला पर्याय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना व गुरांच्या मालकांना अनुदानातून गोबरगॅस दिले. जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोबर गॅसचा वापर घरातील स्वयंपाकासाठी होतो. या इंधनाबरोबरच घरातील दिव्यासाठीही गोबर गॅसचा उपयोग होत होता़ त्यामुळे या योजनेला विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत होता़ खेडेगावातील बहुतेक सधन शेतकऱ्यांच्या घरात या गोबर गॅसचा वापर होत होता़ परंतु काही वर्षापासून आधुनिक युग व गुरांचे प्रमाण कमी होऊन शेण मिळेनासे झाल्याने गोबर गॅसचा वापर आपोआप कमी होत गेला. आधुनिक युगातील रेडीमेड सिलेंडर गॅसचा वापर दिसू लागला आहे़ मात्र, लोकसंख्येच्या मानाने गॅस सिलेंडर व रॉकेलचा पुरवठा कमी होत असल्याने त्यामध्ये होणारी सततची भाववाढ, कृत्रिम इंधनाचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम, वाढती महागाईमुळे पुन्हा गोबर गॅसचा पर्याय निवडण्याची गरज निर्माण असल्याचे जुन्या जाणकारांचे म्हणणे आहे़ गोबर गॅस हा गुरांच्या शेणापासून तयार होतो़ रोजच्या वापरात किमान चार ते पाच घमेली शेणाची आवश्यकता आहे़ परंतु आधुनिक युगात सारेच महाग झाल्याने या महागाईचा परिणाम गुरांच्या खरेदीवर व त्यांना लागणाऱ्या खाद्यावर होतो़ परिणामी, गुरे पाळणे तितकेसे सोपे राहिलेले नाही़ कारण जंगल संपत चालल्याने गुरांना भरपूर चारा मिळणे कठीण झाले आहे़ नवीन खरेदी करण्यास हाताला पैसा नाही़ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.ओंदे गावात ५० वर्षांपूर्वीची शेगडीआजही गेल्या ५० वर्षांपासून गोबर गॅस वापरणारे ओंदे येथील शेतकरी विजय दामोदर सांबरे यांनी हा प्रकल्प आजही जोपासलेला असून आजही ते जवळजवळ ५० जणांचे जेवण, नास्ता, चहा करीत असून घरामध्ये सर्वासाठी फक्त गोबरगॅसचा वापर हात आहे़ त्यांचेकडे ५० वर्षांपुर्वीची गॅसशेगडी असून शेतापासून ते स्वयंपाकघरापर्यत गॅस पाईप लाईनही तेवढीच जुनी आहे़ त्यामध्ये त्यांनी आजही बदल केलेला नसून त्यांच्या या गोबर गॅसचा ते अजुनही पूर्ण क्षमतेने वापर करीत आहे़ त्यामुळे त्यांचे हजारो रुपयांची महिन्याची बचत होत आहे़ कारण त्यांचेकडे रोज ५० माणसांचे जेवण केले जाते. कारण ते हॉस्टेल चालवित असून तेथे राहाणाऱ्या विद्यार्थ्याच्या जेवणाची जबाबदारी त्यांच्याकडे असते. त्यामुळे त्यांना गोबर गॅस हा बिना पैशात मिळत आहे़ तसेच त्यांनी शेण मिळविण्याकरीता व दुधाकरीताही दोन म्हशीच विकत घेतल्या आहे़ आजही त्यांचेकडे गेल्यावर ५० वर्षांपासुन चालत आलेला गोबर गॅस व त्याचे साहित्य पाहावयास मिळेल़