शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

कोनफळ कचोरी... ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 23:23 IST

ठाणे : श्रावण सुरू झाला, की उपाहारगृहात, घरगुती खाद्यपदार्थ मिळणाºया दुकानांत उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. उपवासातही खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी अशा नव्या पदार्थांची भर पडली आहे.यंदा हॉटेल्समधील खाद्यपदार्थांना जीएसटीचा चटका बसला असला, तरी उपाहारगृहातील उपवासाच्या पदार्थांना जीएसटीची झळ पोचली नसल्याचे ...

ठाणे : श्रावण सुरू झाला, की उपाहारगृहात, घरगुती खाद्यपदार्थ मिळणाºया दुकानांत उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू होते. उपवासातही खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी साबुदाणा बटाटा पुरी, कोनफळ कचोरी, ड्रायफ्रुट मलई मटका लस्सी अशा नव्या पदार्थांची भर पडली आहे.यंदा हॉटेल्समधील खाद्यपदार्थांना जीएसटीचा चटका बसला असला, तरी उपाहारगृहातील उपवासाच्या पदार्थांना जीएसटीची झळ पोचली नसल्याचे दुकानमालकांचे म्हणणे आहे.श्रावणात उपहारगृहांबरोबरच घरोघरी उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. सोमवार, गुरूवार, शुक्रवार, शनिवार अशा त्या-त्या वाराच्या उपवासानुसार वेगळे पदार्थही केले जातात. यातील तळणाचे काही पदार्थ, उपवासाची भाजणी बºयाचदा रेडीमेड आणली जाते. साबुदाणा खिचडी, वºयाचे तांदूळ, साबुदाणा वडे यासारखे पदार्थ घरी बनवले जातात.पण ग्राहकांना श्रावणानिमित्त वेगळे काही हवे असते, हे लक्षात घेता त्याप्रमाणे उपहारगृहांत पदार्थ बनवले जातात. काही पदार्थ हे त्याच दिवशी तर काही पदार्थांची तयारी आदल्यादिवशी होते. थालीपीठ, उपवासाची मिसळ, उपवासाची कचोरी, राजगिरा लाडू, राजगिरा चिक्की, राजगिरा रोल, खजूर रोल, शेंगदाणा लाडू यासारख्या पदार्थांना अधिक मागणी असते. उपवासाच्या भाजणीपासून तयार करण्यात आलेल्या रुचकर, खमंग थालीपीठाला खवय्ये चांगलीच पसंती देतात.श्रावणात साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची आमटी, बटाटा-रताळ््याचे काप, कचोरी असे पदार्थ खाऊन कंटाळलेल्या खवय्यांसाठी यंदा उपाहारगृहांत नवे पदार्थ आहेत. काही ठिकाणी राजगिºयाच्या पुºया श्रीखंडाचा बेत असतो. कुठे उपवासाचे डोसे, इडली मिळते. उपवासाचा बटाटा वडा, फराळी मिसळ, खरवस, उपवासाची पुरी भाजी, बटाटा पुरी, फ्रेंच फ्राइजसारखे बटाट्याचे खुसखुशीत काप, ओल्या नारळाची तिखट कचोरी, कटलेट, उपवास स्टफ पॅकेज, मसाला दूध, लस्सी, पियुष यांचा समावेश असतो.उपवासाच्या थाळीत वºयाचा भात, शेंगदाण्याची आमटी, बटाट्याची भाजी, उपवासाची पुरी, श्रीखंड अशा पदार्थांचा समावेश असतो. ही थाळी केळीच्या पानात दिली जाते, असे उपहारगृहाचे मालक केदार जोशी यांनी सांगितले. नेहमीच्या पुरीपेक्षा वेगळी साबुदाणा-बटाटा पुरी हे यंदाचे वैशिष्ट्य आहे. कोनफळ नेमाने खाल्ले जात नाही. पण त्याची कचोरी सुंदर लागते आणि लस्सीत नेहमीच्या मँगो, चॉकलेट फ्लेवरपेक्षा ड्रायफ्रूट-मलईचा समावेश पोटभरीचा होतो. त्यातही ती छोट्या मटक्यात दिली, तर तिची रंगत वाढते. त्यामुळे यंदाचा ठाणेकरांचा उपवास वेगळ््या चवीचा, वेगळ््या ढंगाचा होण्याची चिन्हे आहेत.