शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

काेपरीच्या बंदरावरील विसर्जन घाटावर मद्यपींच्या पार्ट्या; रहिवाशांमध्ये संताप

By सुरेश लोखंडे | Updated: April 1, 2024 15:59 IST

रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत.

ठाणे : येथील पूर्वेकडील चेंदणी कोळीवाडा बंदराच्या विसर्जन घाटाचा ठाणे महापालिकेने चेहरा मोहरा बदलला आहे. मात्र रात्रीच्या वेळी येथील पदपथावरील दिव्यांचा मंद प्रकाशाचा गैरफायदा घेऊन मद्यपी, गर्दुल्ले या निसर्गरम्य खाडी परिसरात धुडगूस घालत आहेत. त्यामुळे संध्याकाळी थाेडा अंधार पडतास स्त्री, पुरूषांना येथून येजा करताना भीती वाटत आहे. त्यात या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे ही चालूबंद हाेत असल्यामुळे रहिवाश्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.            

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टमधील एक कोपरी विसर्जन घाट ओळखला जात आहे. पण पालिकेच्या दुर्लक्षितपणाचा गैफायदा घेऊन मद्यपी तळीराम संध्याकाळी थाेडा अंधार पडताच या घाटाचा ताबा घेऊन धुडगुस घालत आहेत. शनिवारी, रविवारीही याचा अनुभव परिसरातील रहिवाश्यांनी घेतला आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाश्यांकडून महापालिकेच्या कारभाराविराेधात नाराजी व्यक्त केली जात आहे. ठाणे पूर्वतील मिनी चौपाटी म्हणून विसर्जन घाटाच्या चेंदणी कोळीवाडा बंदराकडे पाहिले जात आहे. येथे वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून विविध कामे केली आहेत. त्यांच्या कान्या काेपऱ्यात बसून मद्यपी रात्रभर पॅग रिचवत असल्याचे वास्तव रहिवाश्यांकडून ऐकायला मिळत आहे.

या परिसरातहज बंदरावर ठाणेकरांची पहाटेपासून सध्या वर्दळ वाढली आहे. खाडी किनारी सूर्योदयाची माेहक दृष्य बघायला मिळत आहे. येथील अँफी थिएटरमधील व्यायामाची कसरत आणि मनाला भुरळ पाडणाऱ्या गाण्यांच्या मैफील सकाळी सकाळी रंगत आहे. मात्र संध्याकाळनंतर या परिसरातील रात्र मद्यपी, गर्दुल्यांमध्ये वैऱ्याची ठरत आहे. पथदिवे पूर्ण क्षमतेने प्रकाश देत नसल्यामुळे त्याचा गैरफादा तळीराम, माद्यपी घेऊन धुडगूस घालत आहेत. या मद्यपीच्या रात्रभर पार्ट्या रंगत आहे. येथे सुरक्षा रक्षकाची खोली असून या ठिकाणी सी सी टिव्ही कॅमेऱ्याचे चित्रण पूर्ण क्षमतेने दिसून येत नाही. यास अनुसरून ठाणे महापालिकेशी संपर्क साधला असता, या परिसरातील सी सी टिव्ही आणि प्रकाश व्यवस्था तपासण्यात येईल.असे एका अधिकाऱ्यांने सांगून त्यावर अधीक बाेलणे टाळले.ठाणे पूर्व मधील विसर्जन घाट सकाळी मनमोहक दिसत असला तरी, रात्रीच्या वेळी मनात भीती असते. परिसरात दिवे सर्वच पेटत नाहीत त्यामुळे अंधार वाटतो. अशातच एखाद्या कोपऱ्यात अंधाराचा गैफायदा घेऊन दारू पिणारी मंडळी दिसतात. त्यामुळे महिलांना एकटे दुकटे फिरताना भीती वाटते.सुचित्रा भोईर (ठाणे पूर्व)

टॅग्स :thaneठाणे