शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात झोपण्यावरून मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला;जखमीची प्रकृती स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 18:59 IST

विविध कारणावरून हाणामारीचे प्रकार वारंवार पाहण्यास मिळतात. पण, क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी कोयत्याचा वापर केला. तद्पूर्वी त्या दोघांनी एकत्र एकाच हॉटेलमध्ये जेवण केले होते.

ठळक मुद्दे फरार हल्लेखारे सलमानचा शोध सुरू जखमीवर जेजे रुग्णालयात उपचार

ठाणे : येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुस-या मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला.यामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या बंडू सोनावणे याला मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचार करण्यात येत असन फरार हल्लेखोर सलमान याचा शोध सुरू आहे. तर जखमी बंडूची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांनी दिली.चाळीसगाव येथील मूळ रहिवाशी असलेला जखमी बंडू सोनावणे आणि फरार हल्लेखोर सलमान हे दोघे गेल्या काही महिन्यांपासून ठाणे रेल्वे स्थानकातील फलाटावर राहत. दोघेही मिळेल ते काम करीत. शनिवारी दोघांनी एकत्र रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये जेवण आणि मद्यप्राशन केले. दरम्यान, त्याचे बिल फरार सलमान यानेच दिले होते. शनिवारी रात्री झोपण्यावरून त्यांच्यात जागेवरून वाद झाला. बंडूने सलमानला झोपण्यास विरोध केल्याने त्याने दारूच्या नशेत त्याच्यावर रागाच्या भरात कोयत्याने हल्ला केला. हा हल्ला सीएसटीकडील एक नंबर फलाटाच्या १०० मीटर पुढे कोपरी येथे घडला. यावेळी हल्लेखोराने डोक्यावर आणि हातावर हल्ले करून तेथून पळून काढला. दरम्यान हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत बंडू हा फलाट क्रमांक दोन येथील ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयात आला. रक्ताने माखलेले पाहून त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, डोक्यावर झालेल्या हल्ल्याचे घाव लक्षात घेऊन तातडीने त्याला मुंबईतील जे.जे रुग्णालयात हलवले. तसेच याप्रकरणी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच तपासात त्यांनी ज्या हॉटेलमध्ये जेवण केले तेथील सीसीटीव्ही कॅमे-यामुळे हल्लेखोर सलमानची ओळख पुढे आले आहे. तसेच त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल.तसेच त्याच्या अटकेनंतर हल्लेचे नेमके कारण पुढे येईल. तर, हा नशेत झोपण्यावरून झाला असावा,असा प्राथमिक अंदाज वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी लोकमतशी वर्तविला आहे. तसेच जखमी बंडूची प्रकृतीस्थिर आहे. हल्लेखोराने वापरलेला कोयता कुठून आणला याचा शोध त्याच्या अटकेनंतर घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अविनाश औंधकर करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिसRailway Passengerरेल्वे प्रवासी