शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतेरा लाखांच्या गुंगीच्या औषधांसह चौकडीला ठाण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 21:41 IST

ट्रामाडोल या गुंगीकारक औषधांची विक्री करणा-या मयूर मेहतासह चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे विक्रीसाठी केंद्राची मनाईठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईट्रामाडोल हायड्रोक्लोराइडच्या टॅबलेटस हस्तगत

ठाणे : विक्रीसाठी बंदी असलेल्या ट्रामाडोल या गुंगीकारक औषधांची विक्री करणा-या मयूर मेहता(४६), रोमेल वाज (४९), संतोष पांडे (४१)आणि दीपक कोठारी (५२) या चौघांना ठाणे खंडणी विरोधी पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून ट्रामाडोल हायड्रोक्लोराइडच्या १२ लाख ७४ हजारांच्या टॅबलेटस हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.वेदनाशमक आणि गुंगीकारक असलेल्या ट्रामाडोल या औषधांची विक्री करण्यासाठी मुंबईतील मयूर मेहतासह चौघेजण येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके आणि उपनिरीक्षक अविनाश महाजन यांच्या पथकाने २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वा. च्या सुमारास ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरातून मयूर मेहता याला आधी अटक केली. त्याच्याकडून १४० छोटया बॉक्समध्येवरील बंदी असलेली नऊ हजार ८०० स्ट्रीप्समधील औषधे तसेच पाचशे रुपये आणि मोबाईल असा १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही औषधे मोठया प्रमाणात गुंगीसाठी वापरण्यात येत असल्याने केंद्र शासनाने त्यांच्यावर बंदी आणली असून ती विक्री करणा-यांवर एनडीपीएस अंतर्गत कारवाई करण्यात येते. दरम्यान, मेहता याने दिलेल्या माहितीच्या आधारे रोमेल, संतोष आणि दिपक या त्याच्या आणखी तीन साथीदारांनाही २५ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. यातील मेहता आणि रोमेल हे दोघे मुंबईतील रहिवाशी असून संतोष पालघर (मूळचा उत्तरप्रदेश ) आणि दीपक अहमदाबादचा रहिवाशी आहे. रोमेल आणि संतोष यांच्याकडून प्रत्येकी एक असे दोन तर दीपक याच्याकडून तीन मोबाइल जप्त करण्यात आले. या चौघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून खंडणीविरोधी पथकाकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या औषधांची मयूरने विक्रीसाठी आॅर्डर दिली होती, असेही तपासात उघड झाले आहे.

‘‘ ट्रामाडोल हे वेदनाशमक असून त्याच्या अतिरिक्त सेवनाने नशा येते. ब-याचदा त्याचा नशेसाठीही वापर केल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यावर केंद्र शासनाने बंदी आणली आहे.’’संजय धनावडे, अध्यक्ष, औषध विक्रेता संघ, ठाणे शहर

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीmedicinesऔषधं