शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशच्या दोन आरोपींकडून १.८0 लाखाचे चरस ठाण्यात जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 19:39 IST

अंमली पदार्थ विक्रीच्या गुन्ह्याला नुकतीच सुरूवात केलेल्या दोन तरूणांना ठाणे पोलिसांनी सोमवारी गजाआड केले. त्यांच्याकडून आणखी एका आरोपीची माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देठाण्याच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईउत्तरप्रदेशच्या आणखी एका आरोपीची माहिती उघडकीसआरोपी नेपाळमधून आणायचे चरस

ठाणे : नेपाळमधून चरस आणून ठाणे, मुंबई परिसरात त्याची विक्री करणार्‍या उत्तरप्रदेशच्या दोन युवकांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी ठाण्यात अटक केली. त्यांच्याजवळून १ लाख ८0 हजार रुपयांचे चरस पोलिसांनी हस्तगत केले.सलमान शाह जमीन अहमद शाह आणि शिवकुमार शर्मा ही या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. ते चरस विक्रीच्या धंद्यात गुंतल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांना मिळाली होती. त्यानुसार आरोपींची माहिती काढली असता, टॉवर नाक्यावरील शिवाजी मैदानाजवळ ते येणार असल्याचे सुत्रांकडून समजले. आरोपींना अटक करण्यासाठी या भागात सापळा रचण्यात आला. सोमवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास या भागात २0 वर्षाचा तरूण आला. हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ९00 ग्रॅम चरस आढळले. या चरसची किंमत १ लाख ८0 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीचा मोबाईल फोन आणि १५0 रुपये रोख पोलिसांनी हस्तगत केले.सलमान शाहने चरसचा साठा काल्हेर येथील शिवकुमार शर्मा याच्याकडून विक्रीसाठी घेतला होता. सलमानला अटक केल्यानंतर त्याने ही माहिती पोलिसांना दिली. त्याच्या जबाबावरून पोलिसांनी शिवकुमारलाही अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. शिवकुमारने चरस कुठून आणले, याची माहिती काढण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. त्यानुसार उत्तरप्रदेशच्या आणखी एका आरोपीचे नाव समोर आले. या तिसºया आरोपीचे नेपाळमध्ये धागेदोरे असून, त्याचा शोध सुरू आहे. सलमान शाह हा भंगार विक्रीचे काम करीत असून, शिवकुमार शर्मा एका सलुनमध्ये कामाला आहे. दोघेही मुळचे उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगरचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आरोपीला कर्करोगचरस विक्रीच्या आरोपाखाली अटक केलेल्या शिवकुमार शर्मा (२२) हा बालवयापासून तंबाखूच्या अधिन गेला होता. त्यामुळे त्याला कर्करोग झाला आहे. या आजाराच्या औषधोपचारासाठी पैसे नसल्याने तो गुन्हेगारी क्षेत्राकडे वळला. शिवप्रकाश आणि सलमान या दोन्ही आरोपींचा हा पहिलाच गुन्हा होता. चरस विक्रीतून त्यांना पाच हजार रुपये नफा मिळणार होता.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस