शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील २७ गावांमध्ये टंचाई : आदेशानंतरही पाणीप्रश्न कायम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 06:49 IST

केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही.

डोंबिवली : केडीएमसीतील २७ गावांमधील पाणीटंचाईच्या निषेधार्थ वारंवार मोर्चे काढूनही समस्या सुटलेली नाही. याप्रश्नी विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख पदाधिकाºयांच्या भेटी, इतकेच काय तर थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. दोन महिन्यांत पाणीप्रश्न न सुटल्यास पुढील निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा पवित्रा नांदिवलीमधील ‘सर्वाेदय पार्क’ इमारतीमधील १८९ कुटुंबीयांनी घेतला आहे.१ जून २००५ ला २७ गावे केडीएमसीत समाविष्ट झाली. तेव्हापासून पाणीप्रश्न सतावत आहे. ग्रामपंचायत असताना जेवढा पाणीपुरवठा होत होता, तेवढाही आता होत नाही. नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याने महिन्याला त्यासाठी लाखो रुपये खर्च होत आहेत.पाणी मिळत नसताना महापालिकेकडून ४० ते ५० हजारांची पाणीबिले पाठवून जखमेवर मीठ चोळण्याचे प्रकार सुरू असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. येथील पाणीप्रश्नावर मंत्रालयदरबारी वारंवार बैठका झाल्या आहेत.नांदिवली परिसरातील रहिवाशांनी काही महिन्यांपूर्वी ‘ई’ प्रभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. तसेच महापौर आणि अन्य पदाधिकाºयांच्या भेटीही घेतल्या होत्या. त्यानंतरही समस्या कायम राहिल्याने रहिवाशांनी याप्रकरणी डिसेंबरमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून साकडे घातले. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्रही पाठवले होते. पत्रात समस्येची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, या पत्राकडे दुर्लक्ष झाले आहे.जलपुनर्भरणाचा नागरिकांना दिलासाच्पाण्याचा कोटा वाढवण्याची केली जाणारी मागणी ही कार्यवाहीअभावी कागदावरच राहिली आहे. परिणामी, पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे नांदिवली येथील समर्थनगरमधील ‘सर्वाेदय पार्क’मधील रहिवासी पाणीटंचाईने पुरते हैराण झाले आहेत.च्संकुलातील रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पामुळे काही अंशी दिलासा मिळाला असला, तरी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाWaterपाणी